

‘आपले सरकार पोर्टल’वरील त्रुटींचे निरसन
कल्याण, ता. ९ (बातमीदार) : ‘आपले सरकार पोर्टल’वर क्रीडा गुण टाकताना येणाऱ्या तांत्रिक त्रुटींचे निरसन केल्याचा दावा जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे काही दिवस दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या क्रीडा शिक्षकांना होत असलेला नाहक त्रास संपुष्टात येण्याची शक्यता आहे. याबद्दलचे वृत्त ‘सकाळ’मध्ये ६ एप्रिलला प्रसिद्ध झाले होते.
राज्य सरकारकडून प्रोत्साहन म्हणून खेळाडू असलेल्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडा गुण दिले जातात. यासाठी या खेळाडूंच्या क्रीडा शिक्षकांना संबंधित खेळाडूंबद्दलची सगळी माहिती, प्रमाणपत्रे, पुरावे शिक्षण मंडळाकडे जमा करावे लागतात. त्यानंतरच या विद्यार्थ्यांना क्रीडा गुण मिळतात. यंदापासून ही माहिती ‘आपले सरकार’ या पोर्टलवर ऑनलाइन टाकावी लागत आहे; मात्र या पोर्टलवर ही माहिती टाकताना अनेक तांत्रिक त्रुटींचा सामना क्रीडा शिक्षकांना करावा लागत होता. याबद्दल वेळीच प्रशिक्षण न मिळाल्याची तक्रार हे क्रीडा शिक्षक करत होते. याबद्दलचे वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाले होते. अखेर या वृत्ताची दखल घेत ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के या सक्रिय झाल्या. बारटक्के या स्वतः माजी कबड्डीपटू आहेत. त्यामुळे त्यांनी पुढाकार घेत त्रुटी दूर करण्यासाठी प्रयत्न केले.
कल्याण-डोंबिवलीतील क्रीडा शिक्षकांनी त्यांना येत असलेल्या सर्व समस्या घेऊन पूर्वीच आमच्याकडे यायला हवे होते. त्यांनी आमच्याशी कधीच संपर्क साधला नाही; मात्र आता ‘आपले सरकार’ पोर्टलवर येत असलेल्या तांत्रिक त्रुटी आम्ही लगेच दूर करून घेतल्या आहेत. तसेच ऑनलाइन अर्ज करताना कोणत्याही क्रीडा शिक्षकाला अडचण आल्यास त्यांना संपर्कासाठी माझ्या कार्यालयातील तीन अधिकारी पूर्णवेळ उपलब्ध असतील. त्यांनी माझ्या कार्यालयातील या अधिकाऱ्यांशी त्वरित संपर्क साधून आलेली अडचण सोडवून घ्यावी.
- सुवर्णा बारटक्के, जिल्हा क्रीडा अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.