विक्रमगडमध्ये सरपंचपदाचे आरक्षण जाहीर

विक्रमगडमध्ये सरपंचपदाचे आरक्षण जाहीर
Published on

विक्रमगड, ता. ९ (बातमीदार) : तालुक्यातील ग्रामपंचायतीचे २०२५ ते २०३० या वर्षासाठी सरपंचपदाचे आरक्षण सोडत विक्रमगड तहसील कार्यालय येथे जाहीर करण्यात आली. तालुक्यातील ३८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले.

अनुसूचित क्षेत्रात येणाऱ्या ग्रामपंचायतींच्या ५० टक्के आरक्षण निश्चित केल्यानुसार तहसीलदार चारुशीला पवार यांनी आरक्षण जाहीर केले. तलवाडा, वेहेलपाडा, करे तलावली, खडकी, डोल्हारी खुर्द, जांभे, डोल्हारी बुद्रुक, करसूड, मोह बुद्रुक, ओंदे, केव, सारशी, देहर्जे, सवादे, भोपोली/घाणेघर, आंबेघर तर्फे धरमपूर, खुडेद, म्हसरोली, इंदगाव या ग्रामपंचायती अनुसूचित जमाती महिलांसाठी आरक्षित असणार आहेत. तसेच उर्वरित १९ ग्रामपंचायती ५० टक्के सरंपच आरक्षण अनुसूचित जमातीसाठी राखीव राहतील. दादडे, उटावली, क्रुझै, केगवा, अलोंडा, सुकसाळे, वसुरी, साखरे, बोरांडा, कोंडगाव, चिंचघर, मलवाडा, चाबके तलावली, बांधण, कासा बुद्रुक, खोस्ते ,उपराळे ,वेढे-चरी, टेटवाली यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com