स्लॅब कोसळून सात कामगार जखमी

स्लॅब कोसळून सात कामगार जखमी
Published on

पनवेल, ता. १० (वार्ताहर) : बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा सज्जा कोसळळ्याने त्या ठिकाणी काम करणारे सात कामगार नवव्या माळ्यावरून तिसऱ्या माळ्यावर पडल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी (ता. ९) रात्री पनवेलमधील ठाणा नाका येथे घडली. या दुर्घटनेला संबंधित बांधकाम व्यावसायिक, लेबर कॉन्ट्रक्टर व सेंट्रिंगचे काम करणारा कॉन्ट्रक्टर जबाबदार असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे पनवेल शहर पोलिसांनी या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पनवेलमधील ठाणा नाका येथे कैलास पार्क या इमारतीचे बांधकाम सुरू असून, बुधवारी रात्री ८च्या सुमारास इमारतीच्या नवव्या माळ्यावरील सज्जाचे स्लॅब भरण्याचे काम सुरू होते. त्या ठिकाणी बांधकाम व्यावसायिक व लेबर कॉन्ट्रॅक्टरकडून लाइटची पुरेशी व्यवस्था करण्यात आली नव्हती. तसेच सेंट्रिंगचे कामदेखील व्यवस्थित करण्यात आले नव्हते. स्लॅब भरण्याचे काम करणाऱ्या कामगारांना सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेले हेल्मेट, सेफ्टी बेल्ट व इतर साधनेसुद्धा पुरविण्यात आली नव्हती. त्याच अवस्थेत सात कामगार त्या ठिकाणी अंधारात काम करत होते. दरम्यान, रात्री ८ वाजण्याच्या सुमारास इमारतीच्या नवव्या माळ्यावरील स्लॅबचा सज्जा कोसळून तो तिसऱ्या माळ्यावर पडला.
-----------------
तिघांवर गुन्हा दाखल
सज्जाचे स्लॅब भरण्याचे काम करणारे सात कामगारदेखील त्या सज्जासोबत नवव्या माळ्यावरून तिसऱ्या माळ्यावर पडले. त्यामुळे सातही कामगार गंभीर जखमी झाल्याने त्याना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेला बांधकाम व्यावसायिक, लेबर कॉन्ट्रॅक्टर व सेंट्रिंगचे काम करणारा कॉन्ट्रॅक्टर जबाबदार असल्याचे आढळून आले आहे. त्यानुसार पोलिसांनी त्यांच्या विरोधात निष्काळजीचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर पुढील कारवाईला सुरुवात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com