

राज्यातील रक्तपेढ्यांचे होणार नियमन
सक्षमीकरण आणि पुनर्रचनेसाठी एसबीटीसीची बैठक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषद (एसबीटीसी), सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कार्यरत रक्तपेढ्यांचे प्रभावी नियमन व सक्षमीकरणासाठी नुकतीच बैठक पार पडली. त्यात राज्यातील रक्त संकलन केंद्रांबाबत व्यापक आढावा घेण्यात आला आणि भविष्यातील धोरणात्मक दिशा निश्चित करण्यात आली.
एसबीटीसीकडून सर्व जिल्हा शल्यचिकित्सकांनी रक्त संकलनावर आधारित तपशीलवार वार्षिक अहवाल तयार करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यात मागील तीन वर्षांतील रक्त संकलन आणि वापराचे आकडे, नष्ट झालेले रक्त व रक्तघटकांची माहिती, रक्तपेढीतील उपकरणांची उपलब्धता, प्लाझ्मा वितरणाचे प्रमाण, थॅलेसिमिया व सिकलसेल रुग्णांना पुरवले गेलेले मोफत रक्त आदींबाबत माहिती देण्यात येणार आहे.
---
निरीक्षण अहवाल सादर करा
प्रत्येक जिल्ह्यातून २७ मुद्द्यांवर आधारित तपशीलवार निरीक्षण मागवले जाणार आहे. हे निरीक्षण संबंधित जिल्हा शल्यचिकित्सकांनी प्रमाणित करून एसबीटीसीकडे सादर करायचे आहे. त्यात कार्यरत रक्तपेढ्यांचे मान्यता पत्र, कर्मचारी उपलब्धता, सुविधा, सुरक्षा उपाययोजना आणि इतर मूलभूत गोष्टींचा समावेश आहे.
----
तंत्रज्ञानाचा वापर
मोबाईल अॅप, पोर्टल आणि टोल फ्री क्रमांकाच्या मदतीने राज्यातील रक्तपेढीतील रक्ताच्या उपलब्धतेबाबत जनतेला माहिती उपलब्ध व्हावी, त्यासाठी प्रयत्न करावे, असे निर्देश देण्यात आले.
----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.