हरवलेले ५० मोबाईल मालकांना सुपूर्द

हरवलेले ५० मोबाईल मालकांना सुपूर्द
Published on

नवी मुंबई, ता. १० (वार्ताहर) : खारघर पोलिसांनी आपल्या हद्दीतील चोरीस गेलेल्या व गहाळ झालेल्या नऊ लाख ५१ हजार रुपये किमतीच्या ५० मोबाईल फोनचा शोध घेऊन ते मोबाईल फोन संबंधित नागरिकांना वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक सुर्वे यांच्या हस्ते परत करण्यात आले. या वेळी हरवलेले व चोरीला गेलेले आपले मोबाईल फोन परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे कौतुक करून त्यांचे आभार मानले.
गहाळ झालेल्या मोबाईल फोनचा शोध घेण्याकरिता केंद्र सरकारने सीईआयआर हे पोर्टल कार्यान्वित केले आहे. या पोर्टलचा वापर करून हरवलेल्या मोबाईल फोनचा शोध घेण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सर्व पोलिस ठाण्यांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार खारघर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक सुर्वे व पोलिस निरीक्षक (गुन्हे) शीतल पाटील यांनी खारघर पोलिस ठाण्यात नोंद असलेल्या चोरीस गेलेल्या व गहाळ झालेल्या मोबाईल फोनचा सीईआयआर पोर्टलवरून आढावा घेऊन त्या मोबाईल फोनचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रदीप आव्हाड, पोलिस उपनिरीक्षक सूरज जाधव, तपास पथकातील तांत्रिक विश्लेषक वाजिद शेख व इतर अंमलदारांनी हरवलेल्या मोबाईल फोनचा शोध घेण्याचे काम सुरू केले होते.
-------------------
विविध राज्यांतून हस्तगत
तपास पथकाने सीईआयआर पोर्टलचा वापर करून मिळालेल्या माहितीच्या आधारे कौशल्यपूर्ण तांत्रिक तपास केला असता, अनेक मोबाईल फोन वेगवेगळ्या जिल्ह्यात व राज्यात वापरात असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानंतर पोलिसांनी अथक प्रयत्न करून काही ठिकाणी स्थानिक पोलिसांची मदत घेऊन ५० नागरिकांचे चोरीला गेलेले व गहाळ झालेले मोबाईल फोन हस्तगत केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com