मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘आयएनएससीआर’ पुरस्कार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 
‘आयएनएससीआर’ पुरस्कार
Published on

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना
‘आयएनएससीआर’ पुरस्कार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘आयएनएससीआर २०२५’ हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार गुरुवारी जाहीर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू केलेल्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ मोहिमेच्या प्रचार-प्रसाराच्या उद्देशाने या  पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे.

नवकिरण संस्था (चित्रपट) बीड जिल्हा पोलिस फाउंडेशन, नेपाळ फिल्म टेक्निशियन असोसिएशन आणि मास्क एमयूएसके इंटेलिजन्स बी. व्ही. नेदरलँड्स आणि सुरीनाम सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार देण्यात येणार आहे. इंडिया- नेदरलँड्स- नेपाळ- सुरीनाम सोशल कोलॅबोरेशन रिवॉर्ड २०२५ हा समाजकल्याण कार्यातील महत्त्वपूर्ण भागीदारी आणि राष्ट्राच्या हितासाठी केल्या जाणाऱ्या कार्याची विशेष दखल घेऊन दिला जाणार आहे. या पुरस्काराचे हे पहिलेच वर्ष आहे. नेदरलँड्सकडून सुरीनाम मंत्रालयाला प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार या पुरस्काराचे आयोजन करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com