

मूठभर बदाम खाण्याचे फायदे
* अँटीऑक्सिडंट्स - बदाम अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असतात, जे शरीरातील हानिकारक रेणू नष्ट करतात.
* व्हिटॅमिन-ई (७.३ मिग्रॅ) : बदाम व्हिटॅमिन-‘ई’चा चांगला स्रोत आहे. यामुळे त्वचा आणि आरोग्यासाठी बदाम लाभदायक ठरते.
मॅग्नेशियम (७७ मिग्रॅ) : बदामातून मिळणारे मॅग्नेशियम स्नायू आणि नसांसाठी महत्त्वाचे आहे.
* फायबर (४ मिग्रॅ) : बदाम फायबरचा चांगला स्रोत आहे. त्यामुळे पचनशक्ती सुधारते.
* लोह (१ मिग्रॅ) : बदामामुळे हिमोग्लोबिन तयार होण्यास मदत होते. अशक्तपणा प्रतिबंधित होऊन ऊर्जा पातळी राखली जाते.
* कॅल्शियम (७६ मिग्रॅ) : हाडे आणि दात मजबूत होतात. हाडांची झीज रोखण्यास मदत होते.
* मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स (९ ग्रॅम) ः हृदय निरोगी ठेवण्यास मदत होते. खराब कोलेस्ट्रॉल (एलडीएल) कमी करते.
* पोटॅशियम (२०८ मिग्रॅ) ः रक्तदाब नियंत्रित करता येते.
* फॉस्फरस (१३६ मिग्रॅ) ः हाडे, दात मजबूत होतात. शरीरात ऊर्जा निर्माण करण्यास मदत होते.
* प्रथिने (६ ग्रॅम) ः स्नायू बळकट करण्यासोबतच शरीर उत्साही राहते. शरीरातील ऊती दुरुस्त करण्यास मदत होते.
* रिबोफ्लेविन (०.३ मिग्रॅ) ः त्वचा आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.