मुलुंड डंपिंगवरील कच-यावर एका वर्षात प्रक्रिया करणार

मुलुंड डंपिंगवरील कच-यावर एका वर्षात प्रक्रिया करणार
Published on

मुलुंड कचराभूमीवरील
कचऱ्यावर वर्षभरात प्रक्रिया
६५ टक्के काम पूर्ण; आमदार कोटेचा यांची माहिती
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० ः मुलुंड कचराभूमी येथील कचऱ्याची पालिकेने निवड केलेल्या जागेवर प्रक्रिया करून वर्षभरात विल्हेवाट केली जाणार आहे. नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत पालिका आयुक्तांनी याबाबत ग्वाही दिल्याची माहिती आमदार मिहिर कोटेचा यांनी दिली. मुलुंड कचराभूमीची जागा समतोल झाल्यानंतर त्या ठिकाणी गोल्फ कोर्स करण्याच्या मागणीबाबत मुख्यमंत्री फडणवीस सकारात्मक असल्याचे कोटेचा म्हणाले.
मुलुंड विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित नागरी सेवासुविधांच्या कामांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत सह्याद्री अतिथीगृहात आढावा बैठक झाली. या वेळी आमदार कोटेचा यांनी मुलुंड येथील कचराभूमीवरील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात दिरंगाई होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. २०१८ मध्ये कचराभूमी बंद करून कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी बायोमायनिंग इंडिया प्रा. लि.ला कंत्राट देण्यात आले. सहा वर्षांत हे काम होणे अपेक्षित होते; मात्र काम दिरंगाईने सुरू असल्याचे कोटेचा म्हणाले.
कोरोनामुळे या कामाला विलंब झाला. सध्या ६५ टक्के काम पूर्ण झाले आहे. महापालिकेने निवड केलेल्या जागेवर प्रक्रिया केलेला कचरा एका वर्षात टाकला जाईल आणि मुलुंड येथील कचराभूमीची जागा समतोल केली जाईल, असे महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी सांगितले.
............
गोल्फ कोर्स बनविण्याची मागणी
प्रक्रिया केलेला कचरा टाकून झाल्यानंतर २४ हेक्टर इतकी जागा ही शहराला खुली जागा म्हणून प्राप्त होईल. त्या ठिकाणी गोल्फ कोर्स बनविण्याची मागणी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक असल्याचे कोटेचा यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com