म्हाडाची शंभर अर्जदारांची महिनाअखेरीस लॉटरी

म्हाडाची शंभर अर्जदारांची 
महिनाअखेरीस लॉटरी
Published on

म्हाडाची शंभर अर्जदारांची
महिनाअखेरीस लॉटरी

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : वर्षानुवर्षे संक्रमण शिबिरात राहणाऱ्या म्हाडाच्या मास्टर लिस्टवरील १०० रहिवाशांना लवकरच हक्काचा निवारा मिळणार आहे. म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील जुन्या उपकरप्राप्त इमारतींतील पात्र भाडेकरू आणि रहिवाशांना घरांचे वितरण करण्यासाठी म्हाडाकडून महिनाअखेर लॉटरी काढली जाणार आहे. त्यामुळे संक्रमण शिबिरात वास्तव्याला असलेल्या संबंधित रहिवाशांचा हक्काच्या घरात जाण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

मुंबई शहरातील धोकादायक उपकरप्राप्त इमारतीमधील भाडेकरू किंवा रहिवाशांची घरे खाली केली जातात, त्यांना संक्रमण शिबिरात पाठवले जाते. त्यांच्या मूळ इमारतीचा भूखंड अरुंद असल्याने आरक्षण, रस्ता रुंदीकरण या कारणामुळे त्या ठिकाणी इमारत उभी केली जाऊ शकत नाही. त्यामुळे म्हाडाकडून संबंधित रहिवाशांचा मास्टर लिस्टमध्ये समावेश करून त्यांना पुनर्रचित उपकरप्राप्त इमारतीत लॉटरी पद्धतीने सदनिका दिली जाते. त्यानुसार मास्टर लिस्टवरील पात्र रहिवाशांची सोडत काढण्याची तयारी म्हाडाने सुरू केली आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com