

मिठागराची जमीन धारावीकरांसाठी सुरक्षित : एस. व्ही. आर. श्रीनिवास
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी देण्यात आलेली मिठागरांची सुमारे २५६ एकर जमीन धारावीकरांसाठी सुरक्षित असल्याचा दावा धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे (डीआरपी) मुख्य कार्यकारी अधिकारी एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी केला आहे. ही जामीन मुलुंड, कांजूरमार्ग आणि भांडुप परिसरात असून, त्यावर अपात्र धारावीवासीयांचे पुनर्वसन करण्याची योजना आहे. पर्यावरणीय दृष्टीने काही जणांनी या प्रस्तावाला विरोध दर्शविला असला तरी ही सर्व जमीन पूर्व द्रुतगतीमार्गाच्या पश्चिमेला असून, गेल्या अनेक वर्षांपासून समुद्र संपर्काबाहेर असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.‘ मिठागराच्या जमिनी द्रुतगती मार्गाच्या पश्चिमेकडे असून, त्या ना जलमार्गाजवळ आहेत, ना पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात येतात. त्यामुळे कोणत्याही प्रकल्प संदर्भातील बांधकामास सुरुवात करण्यापूर्वी सर्व आवश्यक पर्यावरणीय मंजुरी घेण्यात येईल आणि सर्व कायदेशीर प्रक्रियांचे काटेकोर पालन केले जाईल, असे श्रीनिवास यांनी नमूद केले आहे. तसेच विकास आराखडा २०३४ अंतर्गत या जमिनी स्वस्त घरे बांधण्यासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. २०१८मध्ये हा आराखडा मंजूर झाला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.