पहिलीपासून इंग्रजीसोबत हिंदीचीही अनिवार्य 
नवीन अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीसाठी आदेश जारी

पहिलीपासून इंग्रजीसोबत हिंदीचीही अनिवार्य नवीन अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीसाठी आदेश जारी

Published on

पहिलीपासून इंग्रजीसोबत हिंदीही अनिवार्य
नवीन अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीसाठी आदेश जारी

मुंबई, ता. १६ ः राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची शालेय स्तरावर अंमलबजावणी करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या राज्य अभ्यासक्रम आराखडा (पायाभूत स्तर) टप्प्याटप्प्याने लागू करण्यासाठी आज शालेय शिक्षण विभागाने आदेश जारी केले आहेत. यात आता पहिली ते पाचवीसाठी मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य असणार आहे.
इतर माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीसाठी माध्यम भाषा, मराठी व इंग्रजी अशा तीन भाषा अभ्यासल्या जाणार असून, इयत्ता सहावी ते दहावीसाठी भाषा धोरण हे राज्य अभ्यासक्रम आराखड्याप्रमाणे असणार आहे. शालेय शिक्षण विभागाने आज नवीन अभ्यासक्रम व पाठ्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी शासन निर्णय जारी केला असून, यात पूर्व प्राथमिकच्या धोरणाबद्दल अजूनही स्पष्ट भूमिका घेण्यात आली नसल्याने यंदाही पूर्व प्राथमिकचे शिक्षण खासगी क्लासेस, प्लेग्रुप आदी संस्थांच्या ताब्यात राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राज्य अभ्यासक्रम आराखड्याची अंमलबजावणी करताना पाठ्यपुस्तक निर्मिती एनसीईआरटीने दिलेल्या सूचनेनुसार बालभारती तयार करणार आहे. मूल्यमापनाबाबत सध्या अस्तित्वात असलेल्या धोरणात तसेच परीक्षा आणि त्यांच्या वेळापत्रकासंदर्भात एससीईआरटीचे महत्त्व अधिक वाढणार असल्याने त्यावर येत्या काळात अनेक वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे व्यवसाय शिक्षणसाठी आवश्यक भौतिक सुविधा कशा उपलब्ध होतील, याचा कोणताही उल्लेख आदेशात नसल्याने यावरही गोंधळाची स्थिती असल्याचे आज जारी केलेल्या शासन निर्णयातून दिसून आले.
नवीन अभ्यासक्रम हा २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात पहिलीपासून लागू होईल. यात सीबीएसई पॅटर्नवरील आधारित अभ्यासक्रम असेल. दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीसाठी २०२६-२७ , पाचवी, सातवी, नववी आणि अकरावीसाठी २०२७-२८ आणि सर्वांत शेवटी आठवी, दहावी आणि बारावीसाठी २०२८-२९ या शैक्षणिक वर्षांत नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी सुरू होईल.
...
मूल्यमापनाच्या सूचना नंतर
अभ्यासक्रम आराखड्याची अंमलबजावणी करताना विद्यार्थ्यांसाठी मूल्यमापनविषयक मार्गदर्शक सूचना एससीईआरटीकडून नंतर जारी केल्या जाणार आहेत. तसेच शालेय वेळापत्रक व तासिकांचे नियोजन हे आराखड्यामध्ये देण्यात आलेल्या तासिकांची संख्या व त्या कालावधीनुसार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
...
परीक्षांचे वेळापत्रक
शाळांच्या सत्र निश्चितीचा कालावधी हा प्राथमिक माध्यमिकच्या संचालकांनी एससाईआरटीच्या सल्ल्याने निश्चित करायचा आहे. यामुळे अनेक शाळांना या नव्या नियमांची अंमलबजावणी करणे बंधनकारक होणार आहे. प्रत्येक वर्षांच्या द्वितीय सत्र अखेरचे संकलित मूल्यमापन, वार्षिक परीक्षा या सत्रअखेरच घेतल्या जातील. त्यांचे वेळापत्रक ठरविताना एससीईआरटीचा सल्ला घेणे आवश्यक असल्याने येत्या काळात परीक्षा आणि त्या सत्रांवरून वाद वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
...
बालभारतीवर एससीईआरटीचा वरचष्मा
इयत्तानिहाय पाठ्यपुस्तके आवश्यक सर्व माध्यमांत उपलब्ध करून देण्याची जबाबदारी एससीईआरटी आणि बालभारतीची राहील. बालभारतीची पाठ्यपुस्तके तयार करण्यासाठी पाठ्यपुस्तक निर्मितीमध्ये वेळोवेळी एससीईआरटीशी संबंधित विभाग प्रमुख व विषय तज्ज्ञ यांचा सहभाग असेल. ही पाठ्यपुस्तके ही निश्चित केलेल्या अध्ययन निष्पत्तींची पूर्तता करणारी व अंमलबजावणीसाठी योग्य आहेत किंवा कसे याची पडताळणीही एससीईआरटीच करेल, त्यानंतर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीची मान्यता मिळेल.
...
पायाभूत स्तराची रचना
स्तर ---------------------- वयोगट ---------------------- इयत्ता
पायाभूत स्तर ---------------------- वय वर्षे ३ ते ८ ---------------------- बालवाटिका-१, २, ३ तसेच इयत्ता १ ली व २ री
पूर्वतयारी स्तर ---------------------- वय वर्षे ८ ते ११ ---------------------- इयत्ता ३ री, ४ थी व ५ वी
पूर्व माध्यमिक स्तर ---------------------- वय वर्षे ११ ते १४ ---------------------- इयत्ता ६ वी, ७ वी व ८ वी
माध्यमिक स्तर ---------------------- वय वर्षे १४ ते १८ ---------------------- इयत्ता ९ वी, १० वी, ११ वी व १२ वी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com