लाच घेताना महावितरणचे दोघे अभियंते जाळ्यात

लाच घेताना महावितरणचे दोघे अभियंते जाळ्यात
Published on

पनवेल, ता. २६ (वार्ताहर) : कंत्राटदाराकडून एक लाख ८४ हजारांची लाच घेणाऱ्या महावितरण कंपनीच्या पनवेल भिंगारी येथील दोन अभियंत्यांना नवी मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (ता. २५) अटक केली. उपकार्यकारी अभियंता संदीप आण्णासाहेब डावरे (वय ४५) आणि कनिष्ठ अभियंता प्रथमेश नवचंद्र चौगुले (३५) अशी या दोघांची नावे आहेत.
तक्रारदार महारुद्र शेळके हे कंत्राटदार असून, ते मे. पालकर फर्मच्या वतीने महावितरण कंपनीची कामे करतात. पालकर फर्मला महावितरणच्या पनवेलच्या भिंगारी येथील कार्यालयाकडून दोन कामे मिळाली होती. त्यापैकी एका कामाच्या बिलाची रक्कम मार्च महिन्यात शेळके यांना महावितरणकडून मिळाली होती; मात्र दुसऱ्या कामाच्या बिलाची रक्कम त्यांना मिळाली नव्हती. भिंगारी कार्यालयातील कनिष्ठ अभियंता प्रथमेश चोगले व उपकार्यकारी अभियंता संदीप डावरे या दोघांनी दुसऱ्या कामासंदर्भात कामाच्या ठिकाणी भेट देऊन बिल मंजूर करणार असल्याचे सांगितले होते. तसेच दोन्ही बिलांच्या रकमेवर टक्केवारीप्रमाणे प्रत्येकी ९२ हजार रुपयांप्रमाणे एक लाख ८४ हजारांची मागणी शेळके यांच्याकडे केली होती. त्यामुळे शेळके यांनी नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक कक्षाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नवी मुंबई युनिटचे पोलिस उपअधीक्षक नितीन दळवी व त्यांच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी पनवेलच्या भिंगारी येथील महावितरणच्या कार्यालयात सापळा लावला होता.
या वेळी कनिष्ठ अभियंता प्रथमेश चोगले व उपकार्यकारी अभियंता संदीप डावरे या दोघांना कॉन्ट्रक्टर शेळके यांच्याकडून एक लाख ८४ हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक कक्षाने दोघांना रंगेहाथ पकडले. त्यानंतर या दोघांविरोधात पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com