उन्हाळ्यात डोळ्यांत चिकटपणा
उन्हाळ्यात डोळ्यांत चिकटपणा
डोंबिवली, ता. ५ (बातमीदार) : उन्हाळा सुरू झाला की उष्णतेच्या लाटेसोबत विविध शारीरिक समस्याही डोके वर काढतात. यामध्ये डोळ्यांचे विकार हे विशेषतः लक्षवेधी ठरतात. उन्हाळ्यात अनेकांना डोळ्यांत चिकटपणा, जळजळ, पाणी येणे, डोळ्यांची आग आणि सूज अशा समस्या उद्भवतात. उन्हाळ्यात तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असते. त्यामुळे वाढत्या तापमानाचा दुष्परिणाम डोळ्यांवर होण्याची शक्यता अधिक असते. तापमान वाढ व उष्णतेमुळे शरीरात व डोळ्यांमध्ये कोरडेपणा वाढण्याची शक्यता असते. उन्हाळ्यात आर्द्रता कमी असल्याने डोळे कोरडे होतात. ज्यामुळे डोळ्यांमध्ये जळजळ होऊ शकते.
उन्हाळ्यात डोळ्यांतून पिवळसर किंवा हिरवट पू सतत येतो. डोळे खूपच लालसर किंवा सूजलेले असतात. तीन-चार दिवसांनीही लक्षणे कमी होत नसतील, तसेच डोळ्यांतून सतत पाणी येत असेल, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे नेत्रतज्ज्ञ नितीन कपाडिया यांनी सांगितले. उन्हाळ्यात डोळ्यांना जळजळ होत असल्याने दिवसातून किमान दोन-तीन वेळा थंड पाण्याने डोळे स्वच्छ धुतल्याने डोळ्यांमध्ये जळजळ कमी होते. तसेच इन्फेक्शन व इतर समस्यांपासून आराम मिळतो. त्यामुळे डोळे स्वच्छ पाण्याने दोन-तीन वेळा धुणे गरजेचे आहे.
काय काळजी घ्यावी?
१. गुलाबपाणी वापरा : गुलाबपाण्यात सूती कापूस भिजवून डोळ्यांवर काही वेळ ठेवणे हे एक उत्तम आरामदायक घरगुती उपाय आहे.
२. डोळ्यांना विश्रांती द्या : स्क्रीनकडे सतत पाहत राहिल्यास डोळ्यांवरील ताण वाढतो.
३. पाणी भरपूर प्या : शरीरातील पाण्याची पातळी योग्य ठेवली तर डोळ्यांत नैसर्गिक ओलावा टिकतो आणि कोरडेपणा टळतो.
४. हात स्वच्छ धुवा : डोळ्यांभोवती हात फिरवण्यापूर्वी हात धुणे अत्यावश्यक आहे. विशेषतः उन्हाळ्यात घामामुळे हातावर बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता असते.
५. सनग्लासेस वापरा : उन्हाळ्यात आर्द्रता कमी असल्याने डोळे कोरडे होतात. त्यामुळे उन्हाळ्यात चांगल्या प्रतीचे सनग्लासेस वापरणे डोळ्यांसाठी फायदेशीर ठरते. चांगल्या दर्जाच्या सनग्लासेसमुळे सूर्याच्या अतिनील किरणांपासून डोळ्यांचे संरक्षण होते. ज्यामुळे उष्ण तापमानातही डोळे चांगले राहतात.
६. धूर, धूळ, बॅक्टेरियल इन्फेक्शन कारणीभूत : उन्हाळ्यात तापमान वाढल्यामुळे रस्त्यांवर धूळ व वाहनातील धूर प्रचंड निघत असतो. या धूर, धूळ व प्रदूषणातील बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे डोळ्यांना त्रास होऊ शकतो. घाम आणि अस्वच्छ हातांनी डोळ्यांना स्पर्श केल्याने इन्फेक्शन होऊ शकते. तापमान वाढल्याने डोळ्यांवर अतिनील किरणांचा परिणाम होऊन दृष्टीस हानी होण्याची शक्यता असते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

