समर कॅम्पमध्ये चिमुकल्याचे लैंगिक शोषण

समर कॅम्पमध्ये चिमुकल्याचे लैंगिक शोषण
Published on

समर कॅम्पमध्ये चिमुकल्याचे लैंगिक शोषण
आरोपी शिक्षक अटकेत
उल्हासनगर, ता. २३ (वार्ताहर) : उन्हाळी सुट्टीनिमित्त आयोजित केलेल्या समर कॅम्पमध्ये एका ४५ वर्षीय नृत्य शिकवणाऱ्या शिक्षकाने अडीच वर्षांच्या चिमुकल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी गुरुवारी (ता. २२) तक्रार दाखल करण्यात आली आहे.
उल्हासनगर कॅम्प नंबर ४ येथील एका क्लासमध्ये उन्हाळी सुट्टीनिमित्त समर कॅम्प आयोजित केला होता. यात अनेक लहान मुलामुलींनी सहभाग घेतला होता. दरम्यान, याच समर कॅम्पमधून घरी आल्यावर एका अडीच वर्षीय चिमुकल्याला शारीरिक वेदना जाणवू लागल्या. पालकांनी याबाबत त्या चिमुकल्याला विचारले असता त्याने नृत्य शिक्षकाने आपल्यासोबत केलेले अश्लील कृत्य कथन केले. या प्रकाराने संतप्त झालेल्या पालकांनी थेट विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात धाव घेत याबाबत तक्रार दाखल केली.
याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने नृत्य शिक्षक जितेंद्र दुलानी याच्या घरावर मध्यरात्रीच्या सुमारास छापा टाकत त्याला अटक केली. या घटनेने संपूर्ण शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com