वृद्ध महिलेची हत्या

वृद्ध महिलेची हत्या
Published on

वृद्ध महिलेची हत्या;
आरोपी गजाआड
तारापूर, ता. २३ (बातमीदार) : आईशी भांडण करून त्रास देत असल्याच्या कारणावरून एका तरुणाने वृद्ध महिलेची हत्या केली होती. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. वावे येथे मंगळवारी (ता. २०) सकाळच्या सुमारास समाज मंदिरात रवू कामडी (वय ७०) या वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी तारापूर पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या तपास, चौकशीअंती वावे डोंगरी पाडा येथील संशयित आरोपी अंकेश चौरे (वय २०) याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता वृद्ध महिला ही आईशी भांडण करून सतत त्रास देत असल्याच्या कारणावरून हत्या केल्याची कबुली त्याने दिली. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली. त्याने वृद्धेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com