दहा लाखांहून अधिक किमतीची रेल्वे तिकिटे जप्त

दहा लाखांहून अधिक किमतीची रेल्वे तिकिटे जप्त
Published on

१० लाखांहून अधिक किमतीची रेल्वे तिकिटे जप्त
दोन दलालांना अटक : मध्य रेल्वेच्या दक्षता पथकाची कारवाई 
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : मध्य रेल्वेच्या दक्षता पथकाने प्रवासी आरक्षण केंद्र (पीआरएस) मलकापूर येथे मोठी कारवाई करत बेकायदेशीर रेल्वे तिकीटविक्रीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. गुरुवारी (ता. २२) करण्यात आलेल्या या कारवाईत दोन दलालांना अटक करण्यात आली असून, १० लाखांहून अधिक किमतीची १८२ रेल्वे तिकिटे जप्त करण्यात आली आहेत.

गुप्तचर माहितीच्या आधारे मध्य रेल्वेच्या दक्षता पथकाने पीआरएस मलकापूर येथे तपासणी केली. तपासणीदरम्यान, संजय चांडक (स्थानिक सूत्रधार) आणि त्याचा १७ वर्षीय सहाय्यक प्रसाद काळे यांना तिकीट दलाली करताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याकडून तत्काळ आरक्षणासाठी वापरलेले ३,९६० रुपयांचे वातानुकूलित तिकीट जप्त करण्यात आले. विशेष बाब म्हणजे, चांडक याचे संबंध मुंबईतील कुख्यात दलाल ‘ठाकूर’शी असल्याचे उघड झाले असून, त्याच्याकडे मलकापूर येथून बुक केलेल्या तिकिटांचे फोटो  व्हॉट्सॲप चॅटद्वारे पाठवण्यात येत होते. या संवादाद्वारे २३ सक्रिय (लाइव्ह) आणि १५९ जुन्या तिकिटांचे पुरावे समोर आले असून, त्यांची एकूण रक्कम १०,०९,८३३ रुपये इतकी आहे. ही तिकिटे बेकायदेशीर पुनर्विक्रीसाठी वापरण्यात येत असल्याचे चांडक यांनी कबूल केले. या प्रकरणात गुन्हा दाखल करून आरोपींना रेल्वे संरक्षण दल (आरपीएफ), मलकापूर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com