

हापूस आंब्याचा भाव कोसळला
किरकोळ बाजारात ८० ते १०० रुपये किलो
मुरबाड, ता. २५ (बातमीदार) : काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे हापूस आंब्याचा भाव कोसळला आहे. सध्या किरकोळ बाजारात ८० ते १०० रुपये किलोने हापूस आंब्याची विक्री होत आहे.
धसई, सरळगाव, मुरबाड या ठिकाणी हापूस आंबे विक्रीसाठी येत असतात. सुरुवातीला दोनशे रुपये ते अडीचशे रुपये किलोप्रमाणे हापूस आंब्याची विक्री झाली; मात्र सतत पडत असलेल्या पावसाने आंब्याचे भाव खाली आले आहेत.
सेंद्रिय शेतीने तयार केलेले हापूस, केशर, पायरी जातीचे पिकलेले आंबे ऐंशी ते शंभर रुपये प्रतिकिलो भावाने किरकोळ बाजारात उपलब्ध झाले आहेत; मात्र दररोजच्या पावसामुळे आंब्याला मागणी कमी झाली आहे. हापूस आंब्याचे खवय्ये असणारे गुजराती बांधव पाऊस पडल्यामुळे हापूस आंबे खाण्याचे टाळत आहेत. दरवर्षी मुरबाड तालुक्यात मेच्या दुसऱ्या आठवड्यानंतर हापूस आंबे पिकण्याचा सीझन सुरू होतो, नेमक्या याच वेळेस पावसाने हजेरी लावल्याने हापूस आंब्याचा भाव कोसळला आहे. यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.