‘एनएमएमटी’मध्ये अश्लील कृत्य करणाऱ्यांना दंड

‘एनएमएमटी’मध्ये अश्लील कृत्य करणाऱ्यांना दंड
Published on

‘एनएमएमटी’मध्ये अश्लील कृत्य करणाऱ्यांना दंड
पनवेल, ता. २५ (वार्ताहर) : पालिकेच्या एनएमएमटी बसमध्ये अश्लील कृत्य करणाऱ्या प्रेमीयुगुलाचा अखेर कामोठे पोलिसांनी शोध घेऊन त्यांना न्यायालयात हजर केले. न्यायालयात दोघांनी आपली चूक कबूल केल्यानंतर त्यांना प्रत्येकी दोन हजारांचा दंड ठोठावून त्यांना सोडून देण्यात आले. एनएमएमटीच्या ७३ क्रमांकाच्या एसी बसमध्ये १८ एप्रिल रोजी ही घटना कळंबोली सर्कलजवळ घडली होती. या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता.

व्हायरल झालेला हा व्हिडिओ ‘एनएमएमटी’तील अधिकारी तसेच नवी मुंबई महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्यानंतर प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन कामोठे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी बसमध्ये अश्लील चाळे करणाऱ्या तरुण-तरुणीविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला होता. अखेर पोलिसांनी या प्रकरणातील प्रेमीयुगुलाचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी या दोघांना न्यायालयात हजर केले. न्यायालयात दोघांनी आपली चूक कबूल केली. त्यानंतर त्यांना प्रत्येकी दोन हजारांचा दंड ठोठावून त्यांना सोडून देण्यात आल्याची माहिती कामोठे पोलिसांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com