

चोरीच्या संशयातून पती-पत्नीला बेदम मारहाण
टिटवाळा, ता. ३१ (वार्ताहर) : म्हारळपाडा येथे एका मागासवर्गीय कुटुंबावर जातीय द्वेषातून हल्ला झाल्याची घटना उघडकीस आली आहे. तक्रारदार व त्याच्या तीन महिन्यांच्या गर्भवती पत्नीला अमानुष मारहाण व छळ करण्यात आला आहे. याप्रकरणी टिटवाळा येथील कल्याण तालुका पोलिस ठाण्यात ॲट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २४ मे रोजी घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून आरोपी संग्राम देशमुख व त्यांच्या कुटुंबीयांनी चोरीच्या संशयावरून विकी भालेराव (वय ३०) व त्याच्या पत्नीला घरी बोलावून घेतले. त्यानंतर दरवाजा बंद करून विकी भालेरावला लाकडी दांडके, लोखंडी हातोडीने मारहाण केली. तसेच विकीचा शारीरिक छळ केल्याची माहिती आहे. विकी याच्या गर्भवती पत्नीलाही मारहाण करण्यात आली. घटनेनंतर आरोपींनी धमकी दिल्यामुळे पीडितांनी तत्काळ तक्रार नोंदवली नाही; मात्र रुग्णालयात उपचार घेत असताना ही घटना सामाजिक कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर बहुजन समाज आणि विविध पुरोगामी संघटनांचे प्रतिनिधी एकत्र आले. त्यांनी पोलिसांशी संपर्क साधत तत्काळ कारवाईची मागणी केली.
रिपब्लिकन पार्टीचे सुनील सोनवणे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे संतोष रोकडे, आंबेडकरी नेते अंबादास वाघ, इस्माईल शेख, भीम आर्मीचे अनिल चव्हाण, तात्या सपकाळे व अॅड. सचिन गांधी यांच्या शिष्टमंडळाने टिटवाळा पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश कदम व उपअधीक्षक शिंदे यांची भेट घेतली. पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत आरोपी संग्राम देशमुख व त्यांच्या कुटुंबातील इतर सहा सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, तीन आरोपींना अटक केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.