

मेंढवन खिंडजवळील अपघातात तिघांचा मृत्यू
कासा, ता. ३१ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील मेंढवन खिंड परिसरात वाडा-खडकोना येथील अपघाती वळणावर शनिवारी (ता. ३१) सकाळी साडेअकराच्या सुमारास अपघात घडला. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून, दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर महामार्गावर काही काळासाठी मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
गुजरातहून मुंबईच्या दिशेने भरधाव निघालेली प्रवासी कार मेंढवन खिंडमधील एका तीव्र वळणावर पुढे चाललेल्या कंटेनरवर आदळली. यानंतर मागून आलेल्या दुसऱ्या एका अवजड वाहनाने कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. या दुहेरी धडकेत कार दोन वाहनांमध्ये चिरडल्याने कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. ग्लोरिया वेलेस (वय ७३), टायटन वेलेस (वय ४३) आणि खगोलीय वेलेस (वय ४५) अशी मृतांची नावे आहेत तर जखमींमध्ये एका लहान मुलीचा समावेश असून त्यांची नावे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत. त्यांना तातडीने कासा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान, अपघाताची नोंद घेऊन पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.