

प्रसाद जोशी, वसई
पालघर जिल्ह्याच्या विकासाकडे गेल्या काही वर्षांपासून केंद्र आणि राज्य सरकारने लक्ष वेधले आहे. महत्त्वाच्या प्रकल्पांमुळे दळणवळण साधनांची उभारणी केली जात आहे. डहाणू तालुक्यातील वाढवण या आंतरराष्ट्रीय प्रकल्पामुळे नवीन वाहतुकीचे मार्ग खुले होणार आहेत. त्यामुळे रस्ते, रेल्वेसह जिल्ह्यात सागरी मार्गाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे.
पालघर जिल्हा हा सागरी, डोंगरी परिसर आहे. येथे आदिवासीबहुल क्षेत्र आहे. जिल्हा निर्मितीनंतर वेगवेगळे बदल होऊ लागले आहेत. वाढवण बंदराची उभारणी सुरू झाली आहे. त्यामुळे व्यापारासाठी नवे दालन, रोजगार निर्मितीकरिता वाव मिळणार आहे, अशी योजना सरकार करीत आहे. त्यातच नवे सागरी मार्ग विकसित केले जाणार असल्याने वाहतुकीला पर्याय मिळणार आहे.
वसई-विरार शहरांतील नागरिकांना प्रवासी सुविधा मिळावी, म्हणून वसई-भाईंदर सागरी फेरी बोट सेवा तसेच विरार ते सफाळे सागरी फेरी बोट सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आपले वाहन बोटीतून नेणे अथवा स्वतंत्रपणे प्रवास करणे सोईचे झाले आहे. महामार्गावर होणारा कोंडीचा त्रास, प्रदूषणाची समस्या यातून काही प्रमाणात दिलासा मिळू लागला आहे. ही सेवा पुढे पालघरमध्ये जाळे निर्माण करणार आहे. त्यामुळे निश्चितच जिल्ह्यातील नागरिकांना याचा लाभ घेणे सहज शक्य होणार आहे.
सद्य:स्थितीत फेरी बोट सेवेतून भाईंदर अथवा वसई गाठणे किंवा पालघरला जाणे सोपे झाले आहे. त्यामुळे वेळ, इंधन बचत होऊ लागली आहे. त्यातच आता मुंबई-वर्सोवा हा सागरी मार्ग भाईंदरपर्यंत होणार आहे. त्यानंतर वसई-विरार शहराला जोडला जाणार आहे. तसेच पुढे पालघर व वाढवण बंदर असा जाणार आहे. बंदर प्रकल्पामुळे वाहतुकीचा दृष्टिकोन समोर ठेवून ही योजना आखली जात आहे.
वाढवण बंदर नव्या रोजगार निर्मितीसह व्यवसाय आणि व्यापाऱ्याला चालना देणार आहे. जगातील हा प्रकल्प पालघरमध्ये होत असल्याने जिल्ह्यात महसुली उत्पन्नात वाढ होणार आहेच, मात्र स्थानिकांना त्याचा फायदा होणार आहे. अशातच सागरी मार्ग विकसित केले जाणार असून, थेट मुंबई ते डहाणू हा पट्टा जोडला जाणार असल्याने वाहतुकीला वेगळे वळण लाभणार आहे.
विकासाला चालना
एकीकडे बुलेट ट्रेन, मुंबई-बडोदा एक्स्प्रेस मार्ग आणि अन्य प्रकल्प पालघरमधून जात असताना डहाणू तालुक्यातील वाढवण बंदर हा कोट्यवधींचा प्रकल्प पालघरच्या विकासाला चालना देणारा ठरणार आहे, अशा दृष्टिकोनातून पाहिले जात आहे.
कोंडीमुक्त प्रवास
सद्य:स्थितीत मुंबई-अहमदाबाद महामार्ग, रेल्वे असे दोन पर्याय वाहतुकीसाठी आहेत. मात्र कोंडी आणि रेल्वेत निर्माण होणारी गर्दी पाहता प्रवाशांचा श्वास गुदमरत आहे. अशातच कोस्टल रोड म्हणजेच सागरी मार्ग विकासाकडे मोर्चा वळवला आहे. नागरिकांना कोंडीमुक्त प्रवास करणे सोपे होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.