सामान्य माणूस केंद्रबिंदू म्हणून काम केलं पाहिजे

सामान्य माणूस केंद्रबिंदू म्हणून काम केलं पाहिजे
Published on

‘सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम केलं पाहिजे’
आमदार राजेंद्र गावित यांची स्पष्ट सूचना
पालघर, ता. ३१ (बातमीदार) ः पालघर हा आदिवासीबहुल जिल्हा आहे. येथे सामान्य माणूस हाच केंद्रबिंदू मानून अधिकारीवर्गाने काम केले पाहिजे, असे स्पष्ट मत आमदार राजेंद्र गावित यांनी व्यक्त केले.
राजेंद्र गावित यांच्या अध्यक्षतेखाली आणि पालघर जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. मुंबई-वडोदरा महामार्ग प्रकल्प, विरार-डहाणू रेल्वे चौपदरीकरण, डीएफसीसी प्रकल्प, बुलेट ट्रेन प्रकल्प, देहारजे धरण प्रकल्प, लेंडी धरण प्रकल्प, खडखड धरण प्रकल्प आदी प्रकल्पांसंदर्भातील बाधित शेतकरी, नागरिक, त्यांचे पुनर्वसन, योग्य मोबदला, शासकीय सेवासुविधा आदींबाबत महत्त्वाचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.
रेल्वेशी संबंधित विषयावर माहिती घेऊन चर्चा करण्यात आली. यामध्ये डीएफसीसी प्रकल्प, बुलेट ट्रेन प्रकल्प, एमआरव्हीसी याबाबत चर्चा करण्यात आली. यासंदर्भातील नागरिकांच्या तक्रारी, त्यांना मिळालेली नुकसानभरपाई याबाबत माहिती घेण्यात आली.
अनेक ठिकाणी जमिनी संपादित करताना संबंधित प्रकल्पाकडून योग्य रीतीने नागरिकांच्या नुकसानभरपाईबाबत स्पष्ट सूचना करण्यात आल्या. यामध्ये ओम साई सोसायटी सहाय्यक, खोजा चाळ, कपाशी ते नवली पुलादरम्यान गेट नं. ४४ व ४५ येथील उड्डाणपूल, बोईसर काटकर पाडा गेट नं. ५२ येथे आरओबी करणे, बोगद्यामधील साचणाऱ्या पाण्याचा निचरा करणे, याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत स्थळ पाहणी करून तत्काळ उपाययोजना करण्याबाबत जाखड यांनी निर्देश दिले.
मुंबई-अहमदाबाद महामार्ग व मुंबई-बडोदा द्रुतगती महामार्गावरील भूसंपादन निवाडा प्रक्रियेतील अनियमितपणासंदर्भात चर्चा करून दुर्वेस, दापचारी, कुडे, पेल्हार येथील नवीन अपग्रेडेशन, ब्लॅक स्पॉट, व्हाइट टॅपिंगचे निकृष्ट काम यासंदर्भात स्थळपाहणी करून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना एनएचएआयचे प्रकल्प संचालक यांना देण्यात आल्या.
पालघर जिल्ह्यातील खडखड, देहेर्जे, लेंडी धरणग्रस्त शेतकरी यांच्या पुनर्वसनाची व नागरी सुविधा तसेच प्रकल्पबाधितांचे हक्क व मोबदला यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम करावे, अशी सूचना राजेंद्र गावित यांनी केली.
या वेळी सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल खत्री, एकात्मिक प्रकल्प अधिकारी जव्हार, उपजिल्हाधिकारी महेश सागर, तेजस चव्हाण, रवींद्र राजपूत, कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग शेवाळे, भूमी अधीक्षक नरेंद्र पाटील, सहाय्यक नगररचनाकार भाग्यश्री, मुंबई-बडोदा, मुंबई-अहमदाबाद महामार्गाचे प्रकल्प संचालक चिटणीस, बोईसरचे सरपंच दिलीप धोडी, उपसरपंच नीलम संखे, अशोक वडे, चंद्रकांत जाधव आदी उपस्थित होते.


फोटो पालघर : आमदार राजेंद्र गावित यांची आढावा बैठक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com