

चारवर्षीय चिमुकलीवर भटक्या श्वानांचा हल्ला
कल्याण पूर्वेतील घटना
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १ : कल्याण-डोंबिवली शहरात भटक्या श्वानांचा उपद्रव वाढत आहे. टिटवाळा येथे एका वृद्ध महिलेवर श्वानांनी हल्ला करत तिला गंभीर जखमी केले होते. यानंतर आता कल्याण पूर्वेत चारवर्षीय चिमुरडीवर सात ते आठ श्वानांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. अर्पिता गुप्ता असे मुलीचे नाव आहे. गुरुवारी (ता. २९) सायंकाळी ४ वाजता ही घटना घडली आहे. मुलीचा ओरडा ऐकून आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेत मुलीची सुटका केली. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
कल्याण पूर्वेतील कैलासनगर जनसेवा जयदुर्गा कॉलनीत मोकाट श्वानांचा उपद्रव जीवघेणा ठरत आहे. गुरुवारी सायंकाळी ४च्या दरम्यान चंदू गुप्ता यांची चार वर्षांची मुलगी अर्पिता हिच्यावर सात ते आठ श्वानांनी हल्ला केला. चाळीच्या गेटवर ती असताना अचानक श्वानांनी हल्ला करत तिला ओढून नेण्याचा प्रयत्न केला. तिचा आरडाओरडा एकूण आजूबाजूचे शेजारी बाहेर धाऊन आले अन् तिची सुटका केली. यामुळे मोठा अनर्थ टळला. अर्पिता हिच्या गालावर, पाठीवर, हातावर श्वानांनी चावा घेतला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे. गुप्ता परिवाराने कल्याण स्वान पथकाला याची माहिती दिली असून, तत्काळ मोकाट श्वानांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.
कैलासनगर, खडेगोळवली, विठ्ठलवाडी परिसरात भटक्या श्वानांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. लहान मुलांवर आणि वृद्धांवर अशा हल्ल्यांची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या भागातील नागरिक भीतीच्या छायेखाली जीवन जगत आहेत. महापालिका प्रशासनाने तत्काळ भटक्या आणि पिसाळलेल्या श्वानांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.