मच्छीमार युवकांना मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण

मच्छीमार युवकांना मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण
Published on

विरार, ता. १ (बातमीदार) : वसईतील पाचू बंदर येथील मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र राज्य सरकारच्या मत्स्यव्यवसाय विभागाचे आहे. येथे सागरी मत्स्यव्यवसायाशी संबंधित नौकानयन व सागरी इंजिन देखभाल व परिचालनाचे प्रशिक्षण दिले जाते. या केंद्रात देण्यात येणारे प्रशिक्षण सहा महिन्यांचे असून, सध्याचा प्रशिक्षण वर्ग १ जुलै ते ३१ डिसेंबरपर्यंत आहे. अर्जाचे नमुने मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, वसई यांच्या कार्यालयातून उद्यापासून (ता. २) मिळणार आहेत. हे अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ३० जून राहील. या प्रशिक्षण वर्गासाठी २२ विद्यार्थी घेण्यात येणार आहेत, असे प्रशिक्षण केंद्राकडून जाहीर करण्यात आले आहे.

या प्रशिक्षण केंद्रात दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थ्यांना १०० रुपये प्रतिमहा व दारिद्र्यरेषेवरील विद्यार्थ्यांना ४५० रुपये प्रतिमहा प्रशिक्षण शुल्क आकारण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची पात्रता वय १८ ते ३५ वर्षे असावे. उमेदवार किमान चौथी पास असणे आवश्यक आहे. उमेदवाराला पोहता येणे आवश्यक आहे. उमेदवार क्रियाशील मच्छीमार असावा. त्याला किमान एक वर्षे मासेमारीचा अनुभव असावा. तसेच प्रवेश अर्ज आदीबाबत माहितीसाठी ज्ञानेश्वर भोसले (८६२४९१९११३) आणि मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी विनोद लहारे (७२७६८२६२७६) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केंद्रातर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com