उद्यानातील पथदिव्याचा खांब ठरला यमराज!

उद्यानातील पथदिव्याचा खांब ठरला यमराज!
Published on

विजेच्या धक्क्याने १४ वर्षीय मुलाचा मृत्यू
बदलापूर, ता. १ (बातमीदार) ः शहरातील चिंतामणी चौक परिसरात राहणाऱ्या राजेश लोखंडे (वय १४) या मुलाचा खेळताना उद्यानातील पथदिव्याच्या खांबाला स्पर्श झाल्याने शॉक लागला. यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी (ता. ३१) रात्री १०.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. राजेशला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेले असता उपचारापूर्वीच मुलाचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.

बदलापूर पश्चिम बदलापूर गाव परिसरात चिंतामणी चौक या ठिकाणी अमृत टॉवर या इमारतीत राहणारा राजेश लोखंडे हा आपल्या मित्रांसह इमारतीच्या शेजारी असलेल्या उद्यानात खेळत होता. या वेळी लपाछपीचा खेळ सुरू असताना राजेश या उद्यानातच एका विजेच्या खांबाच्या शेजारील झाडामागे लपायला गेला. या वेळी त्याचा स्पर्श या खांबाला झाल्याने विजेचा जोरदार झटका लागला आणि यातच त्याची शुद्ध हरपली. या वेळी आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी लगेचच उपचारासाठी राजेशला बदलापूर पूर्व ग्रामीण रुग्णालयात नेले; मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे येथील डॉक्टरांनी सांगितले. या वेळी महावितरणचे सहाय्यक अभियंता रोशन तिरपुडे यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी आम्ही या सगळ्या प्रकरणाची चौकशी करीत असून, त्याच विजेच्या खांबाचा वीजप्रवाह आम्ही तपासला असता त्या ठिकाणी वीजप्रवाह सुरू होता, असे निदर्शनास आले. त्यामुळे रात्री झालेल्या घटनेत हा अपघात होता, की कोणाच्या चुकीमुळे ही घटना घडली, यासंदर्भात आम्ही तपास करीत आहोत, असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com