

भाईंदर, ता. १ (बातमीदार) : मिरा रोड येथे अमली पदार्थविरोधी कक्षाने २२ लाखांचा चरस जप्त केला आहे. याप्रकरणी एक व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
मिरा रोड परिसरात अमली पदार्थविरोधी कक्षाचे पोलिस पथक गस्त घालत असताना के. डी. एम्पायर भागात शनिवारी (ता. ३१) रात्री पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास एक व्यक्ती संशयास्पद स्थितीत प्लॅस्टिकची पिशवी घेऊन उभा असलेला दिसला. पोलिसांनी त्याची चौकशी करून झडती घेतली असता त्याच्याकडे दोन किलो वजनाचा व सुमारे २२ लाखांचा चरस हा अमली पदार्थ आढळून आला. पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याचे नाव मोहम्मद सारीम मोहम्मद जाबीर शेख (वय २२) आहे. तो मुंबईतील धारावीमध्ये राहणारा आहे. त्याच्यावर अमली पदार्थविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.