वटपौर्णिमेची तयारी जोमात; बाजारपेठा पूजेच्या साहित्याने फुलल्या
वटपौर्णिमेसाठी बाजारपेठा फुलल्या
महिलांची खरेदीसाठीची लगबग
ठाणे, ९ जून (प्रतिनिधी) ः वटपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर ठाणे परिसरातील बाजारपेठा सध्या पारंपरिक पूजेच्या साहित्याने फुलल्या आहेत. स्थानक परिसर असो वा मुख्य रस्त्यावरील चौक सर्वत्र महिलांची खरेदीसाठीची लगबग दिसून येत आहे.
रस्त्याच्या दुतर्फा फुलमाळा, विडाची पाने, धागे, पूजेची विशेष साखरफुटाण्यांची पुडकी, हळद-कुंकू, बांगड्या, माळा, टिकल्या, सिंदूर, फळं, सुपाऱ्या, अगरबत्त्या आणि पारंपरिक पाळे भरलेले छोटे टोपले विक्रीस ठेवले गेले आहेत. याचबरोबर पूजेचा धागा आणि वडाच्या झाडाची प्रतिकृतीदेखील बाजारात उपलब्ध आहे.
हिंदू धर्मात वटपौर्णिमा या सणाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. पतीच्या दीर्घायुष्याच्या प्रार्थनेसाठी विवाहित स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात. वटसावित्रीच्या या व्रतात सावित्रीच्या पतीसाठी यमधर्मराजाकडे केलेल्या विनवणीचे स्मरण केले जाते. महिलांनी उपवास करून वडाच्या झाडाभोवती सात फेरे घालत पतीस दीर्घायुष्य लाभो यासाठी प्रार्थना केली जाते.
पूजेच्या विविध वस्तू आकर्षक रचनेत
ठाणे स्थानक परिसर, नवनगर, कोपरी आणि वागळे इस्टेट येथे महिलांनी सोमवारी (ता. ९) सकाळपासूनच पूजेचे साहित्य विक्रीसाठी रस्त्याकडेला मांडले आहे. या महिलांनी घरच्या घरी पारंपरिक पद्धतीने तयार केलेल्या पूजेच्या विविध वस्तू आकर्षक रचनेत तयार करून विक्रीस आणल्या आहेत. विक्रेती पार्वती यांनी सांगितले की, दरवर्षी वटपौर्णिमेच्या आधी दोन-तीन दिवस आधीपासून तयारी सुरू होते. घरच्याघरी बत्ताशा तयार करून साडेतीन रुपयांची किंवा पाच रुपयांची पूजेची छोटी पाकिटं तयार करतो.
तर वटपौर्णिमा म्हणजे स्त्रीसाठी श्रद्धा, विश्वास आणि नात्याची नाळ. वर्षातून एकदा साजरा होणारा हा सण आपल्या पतीसाठी शुभेच्छा देण्याचा प्रसंग आहे. त्यामुळे त्यासाठी पूजेच्या सगळ्या वस्तू अगदी पूर्ण आणि पारंपरिक हव्याच असतात, असे गृहिणी दीपाली जाधव यांनी म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.