तटकरे यांच्यामुळे जिल्ह्यातील वातावरण दूषित

तटकरे यांच्यामुळे जिल्ह्यातील वातावरण दूषित

Published on

तटकरे यांच्यामुळे जिल्ह्यातील वातावरण दूषित
शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांची खरमरीत टीका
रोहा, ता. ९ (बातमीदार) ः ज्या पक्षाचे आमदार जास्त, त्या पक्षाला जिल्ह्याचा पालकमंत्रिपद मिळणार, असे धोरण खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले होते. असे असताना खासदार सुनील तटकरे यांनी केवळ पालकमंत्रिपद आपल्या मुलीला मिळवून देण्यासाठी खटाटोप केल्याने रायगड जिल्ह्यातील राजकीय वातावरण दूषित झाले असल्याचा आरोप शिवसेना (शिंदे गटाचे) जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी केला आहे. राजकीय जीवनात आपल्यापेक्षा इतर कोणीही मोठे होऊ नये, यासाठी आतापर्यंत खासदार सुनील तटकरे यांनी त्यांचे राजकीय गुरू बॅ. ए. आर. अंतुले, राष्ट्रवादी नेते शरद पवार, माजी आमदार माणिकराव जगताप, अशोक शेठ साबळे यांनादेखील त्यांनी फसवले आहे. त्याचप्रमाणे ज्येष्ठ नेते भाई पाशीलकर यांनादेखील घरी बसवण्याचे काम तटकरे यांनी केल्याची खरमरीत टीका जिल्हाप्रमुख घोसाळकर यांनी केली आहे.
रोहा शासकीय विश्रामगृहात रविवारी रोहा शिवसेने (शिंदे गट)च्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर रोहा तालुकाप्रमुख ॲड. मनोज कुमार शिंदे, शहर अध्यक्ष मंगेश रावकर आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी सुधाकर घारे यांचादेखील खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले की, सुधाकर घारे यांनी निवडणुकीत उघड उघड बंड केला होता. महायुतीचा धर्म पाळला नाही. ते आज मंत्री भरत गोगावले व अन्य आमदारांबद्दल बोलत आहेत. बंडखोरी करणाऱ्या घारे यांना राजीनामा माघायचा किंबहुना काहीही बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, असे घोसाळकर म्हणाले. लोकसभा निवडणुकीत खासदार सुनील तटकरे यांना निवडून आणण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री यांचा आदेश पाळला होता. म्हणून तटकरे भरघोस मतांनी निवडून आले. निवडून आल्यानंतर आम्‍ही महायुतीचे खासदार आहोत, असे तटकरे वारंवार बोलत होते, मात्र पाच महिन्यानंतर त्यांनी आपले खरे रूप दाखवले, अशा शब्दात त्यांनी तटकरे यांचा समाचार घेतला. ते म्हणाले की, सेनेकडे पालकमंत्रिपद जाऊ नये म्हणून विधानसभा निवडणुकीत आमच्या तिन्ही आमदारांच्या विरोधात तटकरे यांनी व त्यांच्या बगलबच्चांनी काम केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com