निसर्गाच्या सानिध्यात समृद्धीच्या वाटा

निसर्गाच्या सानिध्यात समृद्धीच्या वाटा

Published on

निसर्गाच्या सान्निध्यात समृद्धीच्या वाटा
कल्याण, ता. १२ (वार्ताहर) : मुरबाडमधील शेलारी म्हाडस येथील शांताई निसर्ग पर्यटन केंद्रात समृद्धीच्या वाटा हा कार्यक्रम नुकताच आयोजित केला होता. जिल्हा परिषद शिक्षक, लेखक, समाजसेवक अशा बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या योगेंद्र बांगर यांनी प्रौढ शिक्षण वर्ग सुरू केले आहेत. गाव-खेडे व आदिवासी, कातकरी कुटुंबातील आजींना एकत्र करून शिक्षणाचे धडे दिले जातात. तसेच शिस्त म्हणून गुलाबी रंगाची साडी चोळी असा सुंदर पेहराव केला जातो. त्यांना वाचनाची गोडी लावली, लेखन शिकवले तसेच समस्त गावकरी, कातकरी कुटुंब बचत गट, दिव्यांग अशा समाज घटकांना लघुउद्योगाचे प्रशिक्षण दिले.

कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मुंबईचे उपजिल्हाधिकारी बाळासाहेब खांडेकर, शिक्षणाधिकारी (योजना) भावना राजभोर, मुरबाड शहराचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप गीते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या प्रमुख पाहुण्यांची पारंपरिक पद्धतीने सजवलेल्या बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. तसेच या वेळी गुलाबीवाडीतील कातकरी मुलींनी आदिवासी नृत्य सादर केले. कार्यक्रमात अनेक संस्था आणि व्यक्तींनी सहभाग नोंदवत आपली उपस्थिती तसे जनजागृती करत सहभाग घेतला.

प्रवीण विशे यांनी पक्षीजगताबद्दल माहिती दिली, तर सुहास पवार यांनी सर्पदंश व उपचार पद्धती सर्पविज्ञान, अंघोळीच्या गोळी संस्थेने पाणीबचत, टीम परिवर्तन यांनी झाडावरील खिळे, इतर संस्था आणि व्यक्तींनी चंदन तथा औषधी वनस्पती, रानभाज्या, बांबू लागवड, आयुर्वेद, निसर्गोपचार व अन्य विषयांवर माहिती देण्यात आली.

समृद्धीच्या वाटा कार्यक्रमात जनजागृतीच्या सात्यत्यपूर्ण कार्याची दखल घेत योगेंद्र बांगर यांच्या हस्ते सन्मानपत्र आणि मुरबाड संदर्भ आणि इतिहास हे पुस्तक प्रदान करण्यात आले. या वाटेवर साथी म्हणून नरेंद्र भिवंडीकर व प्रसाद देवरे यांचे सहकार्य मिळाले. ज्येष्ठ सर्पमित्र दत्ता बोंबे, पडघा पोलिस पाटील किशोर बजागे, नागरी संरक्षण दल विभागीय क्षेत्ररक्षक अजित कारभारी, अंघोळीची गोळी संस्थेचे अविनाश पाटील, भूषण राजेशिर्के तसेच हेल्पिंग हॅण्ड चे सर्पमित्र प्रवीण भालेराव, कृष्णकांत अहिरे, जय देशमुख उपस्थित होते.

शैक्षणिक साहित्याचे विनामूल्य वाटप
छायाचित्र प्रदर्शनाद्वारे नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. सान्वी संस्थेच्या सहकार्याने ५०० हून अधिक महिलांना जीवनावश्यक वस्तू आणि १५० हून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे विनामूल्य वाटप केले, तर काही संस्थांनी कातकरी कुटुंबासाठी शेतात लागवडीदरम्यान पावसाळ्यात वापरले जाणारे इरले विनामूल्य वाटप केले. अशा अन्य पद्धतीने योगेंद्र बांगर यांनी उपस्थित जनसमुदायाला ‘समृद्धीच्या वाटा’ दाखवल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com