मोदींच्या नेतृत्वाखाली गरिबीत वेगवान घट

मोदींच्या नेतृत्वाखाली गरिबीत वेगवान घट
Published on

मोदींच्या नेतृत्वाखाली गरिबीत वेगवान घट
अतुल भातखळकर यांचा दावा
मुंबई, ता. ११ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतातील गरिबीत वेगाने घट होत आहे, असे कांदिवली पूर्वचे भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी विकसित भारत संकल्प सभेदरम्यान सांगितले.
जागतिक बँकेने दारिद्र्यरेषेचे आंतरराष्ट्रीय निकष उंचावल्यानंतरदेखील आपल्या देशातील २७ कोटी नागरिक दारिद्र्याच्या जोखडातून मुक्त झाले. २०११-१२ मध्ये देशातील २७ टक्के लोक अत्यंत गरीब होते, तर २०२२-२३ मध्ये हा आकडा साडेपाच टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. ग्रामीण गरिबी ६९ टक्क्यांवरून फक्त साडेपाच टक्क्यांवर आली आहे, असेही भातखळकर म्हणाले. यानिमित्ताने पोईसर, ठाकूर कॉम्प्लेक्स मंडळ आणि कांदिवली पूर्व मंडळाचे वॉर्ड पदाधिकारीदेखील घोषित करण्यात आले. या संघटनात्मक पर्वात कांदिवली पूर्वच्या बूथ समित्या, शक्ती केंद्र, वॉर्ड रचना, मंडळ रचना पूर्ण झाल्या असून, आता मतदारसंघातील प्रश्न आणि समस्या त्वरेने सोडवल्या जातील, असेही ते म्हणाले. या वेळी मनसे, शिवसेना उद्धव गट तसेच काँग्रेस या पक्षांमधील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com