नवीन शाळा, वर्ग, पुस्तकांमुळे विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित

नवीन शाळा, वर्ग, पुस्तकांमुळे विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित
Published on

अंबरनाथ, ता.१६ (बातमीदार) : शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी नवीन दप्तर, नवीन पुस्तके हाती पडली. शिवाय, शाळेची नवीन चकचकीत इमारत पाहून नगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाल्याचे चित्र सोमवारी (ता. १६) पाहावयास मिळाले.
अंबरनाथ नगरपालिकेच्या एक नंबर शाळेच्या जुन्या शाळेच्या जागी बांधण्यात आलेल्या दुमजली सुसज्ज इमारतीमध्ये शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी नगरपालिका मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड, स्थानिक माजी नगरसेवक अब्दुल शेख, नगरपालिका शिक्षणाधिकारी जयश्री धायगुडे, शहर अभियंता राजेश तडवी, पंकज पन्हाळे, शाळा मुख्याध्यापक जयसिंग कातकर, शिक्षक, तसेच पालकांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. अनेक वर्षे जुन्या असलेल्या शाळेच्या जागी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्याशी पाठपुरावा करून माजी नगरसेवक अब्दुल शेख यांनी पालिकेच्या माध्यमातून अंदाजे १० कोटी रुपये अनुदानातून सुसज्ज दुमजली इमारत अल्पावधीत बांधली. शाळेत केजी ते आठवीपर्यंत शिक्षणाची सोय आहे. तीन शाळा एकत्र भरतात. डिजिटल सोयही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मुख्याधिकारी गायकवाड यांच्या हस्ते विविध पुस्तके, शाळेची बॅग आणि गुलाबाचे फुल देऊन विद्यार्थ्यांचे शाळेच्या पहिल्याच दिवशी स्वागत केले. शाळा क्रमांक एक, ११ आणि १३ या एकत्र असलेल्या तीन शाळेत मागील वर्षीपेक्षा ८० विद्यार्थी नव्याने दाखल झाल्याने पटसंख्या वाढल्याचे ते म्हणाले.

शाळा नंबर एकमध्ये ११ आणि १३ तामिळ भाषिक शाळा एकत्र आहेत. शासकीय धोरणानुसार विद्यार्थ्यांचे शाळेच्या पहिल्या दिवशी स्वागत केले. शाळेतील सुविधांचा विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी उपयोग होईल. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश घ्यावा.
- अब्दुल शेख, माजी स्थानिक नगरसेवक

खासदार डॉ. शिंदे, आमदार डॉ. किणीकर, माजी नगरसेवक शेख आणि पालिका प्रशासनाधिकारी आदींच्या प्रयत्नातून झालेल्या शाळेची इमारत पाहून पटसंख्या वाढली आहे. शाळेत जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थी यावेत, त्यातून चांगले नागरिक निर्माण घडवण्यासाठी प्रयत्न करू.
- जयसिंग कातकर, मुख्याध्यापक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com