केडीएमसीच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना नोटीस

केडीएमसीच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना नोटीस
Published on

केडीएमसीच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना नोटीस
तिन्ही रुग्णालयांत वरिष्ठ अधिकाऱ्यांना आढळल्या त्रुटी

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १७ : कल्याणमधील रुक्मिणीबाई रुग्णालयात दोन महिन्यांपूर्वी रुग्णवाहिकेअभावी एका महिलेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी आयुक्तांनी रुक्मिणीबाई रुग्णालयातील डॉक्टरांसह एकूण सहा कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित केले होते. तसेच आरोग्य विभागाच्या कामकाजात शिस्त आणण्यासाठी मुख्यालयातील आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या पालिका आयुक्तांनी केल्या होत्या. एवढा दणका बसूनही आरोग्य विभाग सुधारण्याची चिन्हे नाहीत. गेल्या आठवड्यात पालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पालिकेच्या तिन्ही रुग्णालयांची अचानक पाहणी केली. या वेळी रुग्णालय कामकाजात अनेक त्रुटी आढळून आल्याने प्रशासनाने रुक्मिणीबाई रुग्णालय, शास्त्रीनगर रुग्णालय आणि वसंत व्हॅली रुग्णालयातील मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांना शिस्तभंग कारवाईची नोटीस बजावली आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाचे उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी ही नोटीस बजावली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेची कल्याणमधील रुक्मिणीबाई व वसंत व्हॅली तसेच डोंबिवलीत शास्त्रीनगर अशी तीन रुग्णालये आहेत. कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात रुग्णवाहिकेअभावी एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यानंतर पालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी पालिकेतील रुग्णालयांची अचानक भेट घेत पाहणी केली. त्या वेळी कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयातील आरोग्य विभागाचा कारभार अतिशय ढिसाळ असल्याचे पालिका आयुक्त गोयल यांच्या निदर्शनास आले. तेव्हापासून त्यांनी आरोग्य विभागावर आपली करडी नजर ठेवली आहे. आरोग्य विभागाच्या कामकाजात शिस्त आणण्यासाठी आयुक्तांनी पालिका मुख्यालयात अनेक वर्षे ठाण मांडून असलेल्या, रुग्णसेवेऐवजी पालिका मुख्यालयात भित्तीपत्रके, जनजागृती पत्रके छापणे, निविदा, नूतनीकरणाची प्रकरणे हाताळण्यात रस असणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. आयुक्त गोयल यांना मिळालेल्या माहितीनुसार
गेल्या आठवड्यात अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, वैद्यकीय आरोग्य विभागाचे उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी रुक्मिणीबाई, शास्त्रीनगर व वसंत व्हॅली रुग्णालयांना भेटी दिल्या. दोन्ही अधिकाऱ्यांनी साध्या वेशात रुग्णालयात दाखल होत कामकाजाची पाहणी केली. या दोन्ही अधिकाऱ्यांनी रुग्णालयाच्या प्रत्येक रुग्ण कक्षात जाऊन पाहणी केली. त्यांना रात्रपाळीतील कर्तव्यावरील कर्मचारी हे बाह्यस्रोत विभागातील असल्याचे समजले. यामध्ये एकही पालिकेच्या आस्थापनेवरील कायमस्वरूपी कर्मचारी नव्हता. रुग्णालयात आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली तरी बाह्यस्रोत कर्मचारी तत्काळ निर्णय घेऊ शकत नाहीत. त्यामुळे अडचणी येण्याची शक्यता असते, हे माहिती असूनही रात्रपाळीत बाह्यस्रोत कर्मचारी कर्तव्यावर ठेवल्याने अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला. अपघात विभागात कर्तव्य असलेले वैद्यकीय अधिकारी हजर नव्हते. ही गंभीर बाब अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आली. रुग्णालयात महिला रुग्ण, कर्मचारी असतात. हे पाहता रुग्णालयातील विकी तेजा हा कर्मचारी अर्ध्या विजारीवर रुग्णालयात रात्रपाळीत उपस्थित होता. कार्यालयीन शिस्तीचा विचार करता हा गंभीर विषय असल्याचे मत अधिकाऱ्यांनी नोंदवले.
याप्रकरणी उपायुक्त बोरकर यांनी रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. शोभना लावणकर, शास्त्रीनगर रुग्णालयाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. योगेश चौधरी, वसंत व्हॅली रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सपना रामोळे यांना कर्तव्यात कसून केल्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com