आजादनगरमध्ये उल्हासनगर महापालिकेची कारवाई

आजादनगरमध्ये उल्हासनगर महापालिकेची कारवाई

Published on

आझादनगरमध्ये महापालिकेची धडक कारवाई
अनधिकृत गाळ्यांवर जेसीबीच्या साहाय्याने तोडक कारवाई
उल्हासनगर, ता. २४ (वार्ताहर) : ‘बेकायदा बांधकाम कराल तर कारवाई होणारच’ या भूमिकेवर ठाम राहत उल्हासनगर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने आझादनगर परिसरातील तीन अनधिकृत गाळ्यांवर सोमवारी (ता. २३) कडक कारवाई केली. या गाळ्यांना महापालिकेच्या पथकाने जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त केले.
आझादनगरमधील आइस फॅक्टरी परिसरात एकूण दहा अनधिकृत गाळे उभारण्यात आले होते. या गाळ्यांविरोधात महापालिकेने संबंधितांना नोटिसा बजावल्या होत्या. यानंतर काही दिवसांपूर्वी महापालिकेने कारवाईचा बडगा उगारत सात गाळे पाडून टाकले होते, तर उर्वरित तीन गाळ्यांमध्ये सामान असल्यामुळे त्यांना रिकामे करण्यासाठी अवधी देण्यात आला होता; मात्र प्रशासनाने दिलेला कालावधी संपल्यानंतर सोमवारी आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग समिती क्रमांक दोनचे साहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाच्या पथकाने कारवाई केली.
संबंधित गाळ्यांमधील मालमत्ता हटविण्यात आल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. पोलिस बंदोबस्तात ही कारवाई शांततेत पार पडली. उल्हासनगर महापालिकेच्या या कारवाईमुळे आझादनगर परिसरात खळबळ उडाली असून, यामुळे इतर अनधिकृत बांधकामधारकांमध्येदेखील भीतीचे वातावरण पसरले आहे. स्थानिक प्रशासनाने यापुढेही अशा अनधिकृत बांधकामाविरोधात कठोर पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com