नालासोपाराकरांची सकाळ धावपळीची
नालासोपारा, ता. २५ (बातमीदार) : शहराच्या पश्चिमेकडील राहुल इंटरनॅशनल शाळेच्या प्राचार्यांना शाळेत बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल आला होता. या प्रकाराने नालासोपारा परिसरात तणावाचे वातावरण झाले, पण काही सापडले नसल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
नालासोपारा पश्चिमेच्या श्रीप्रस्थ येथे राहुल इंटरनॅशनल स्कूल ही खासगी शाळा आहे. या ठिकाणी पहिली ते बारावीपर्यंतच्या मुलांना शिकवले जाते. वसई-विरार सह मिरा-भाईंदर परिसरातील नामवंत शाळा असल्याने हजारो विद्यार्थी येथे दररोज येतात. अशातच बुधवारी सकाळी ४ वाजून २६ मिनिटाला शाळेच्या प्राचार्यांच्या मेलवर शाळेत बॉम्ब ठेवला असल्याचा एक मेल आला होता. कोणतीही जीवितहानी करायची नसून शाळेत आरडीएक्स ठेवल्याचा मजकूर लिहिण्यात आला होता. त्यामुळे शाळा प्रशासनाने महापालिकेच्या अग्निशमन दलासह पोलिसांना याबाबतची माहिती दिली. या वेळी पोलिसांच्या पथकाकडून तत्काळ शोधमोहीम राबवण्यात आली, पण बॉम्बसदृश वस्तू सापडली नसल्याने कोणीतरी जाणीवपूर्वक हा प्रकार केल्याचा अंदाज आहे.
----------------------------
काही काळासाठी गोंधळाचे वातावरण
पालघरचे बॉम्बशोधक पथक शाळेत दाखल झाले. या पथकाने शाळेची इमारत, खोल्या, परिसर, पार्किंगमधील गाड्या, भंगार वस्तू या ठिकाणाची श्वान पथकासह तपासणी केली, मात्र काही आढळून आलेले नाही. हा ई-मेल कोणी पाठवला होता, याचा तपास केला जात आहे. तसेच बॉम्बसुदृश कोणतीही वस्तू आम्हाला मिळाली नसल्याची माहिती मिरा-भाईंदर-वसई-विरार पोलिस आयुक्तालयाचे पोलिस उपायुक्त जयवंत बजबळे यांनी दिली आहे.
----------------------------------------
शाळेच्या मुख्याध्यापकांना हा मेल आला होता. त्याची माहिती तत्काळ पोलिसांना देण्यात आली.
-लल्लन तिवारी, ट्रस्टी, राहुल इंटरनॅशनल स्कूल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.