निवडणुकीसाठी गावांचे विभाजन टळणार

निवडणुकीसाठी गावांचे विभाजन टळणार

Published on

पनवेल, ता. २६ (बातमीदार) : जिल्हा परिषद, पंचायत समितीची प्रभाग रचना (गट, गण) करण्यासाठी अधिसूचना काढण्यात आली आहे. ही रचना करताना प्रशासनाला संगणकीकृत नकाशाचा वापर करावा लागणार आहे. प्रत्येक घटकासाठी तसे विशिष्ट रंगांमध्ये दर्शविले जाणार असून, निवडणूक विभाग तयार करताना कुठल्याही गावाचे किंवा अनुसूचित जाती-जमातीच्या वस्त्यांचे शक्यतो विभाजन होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
रायगड जिल्हा परिषद व त्या अंतर्गतच्या पंचायत समित्यांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून प्रशासकराज सुरू आहे. या लांबलेल्या निवडणुका घेण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर ग्रामविकास विभागाने नुकतीच अधिसूचना जाहीर केली आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासंदर्भात वारंवार माजी सदस्यांच्या संघटनांकडून राज्य सरकारकडे पाठपुरावा केला जात होता; परंतु तांत्रिक अडचणीमुळे निवडणुका घेता येत नसल्याचे उत्तर मिळत होते. अखेर न्यायालयाने सूचना केल्यानंतर प्रशासनाकडून निवडणुकीसंदर्भात वेगाने काम सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शक सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये गट आणि गण रचना करताना शक्यतो संगणकीकृत नकाशाचा वापर करण्यास सांगण्यात आले आहे. जिल्ह्याचा एकत्रित आणि तालुकानिहाय हे नकाशे तयार केले जातील. शिवाय गट, गणांमधील गावांच्या हद्दी, ग्रामपंचायतीचे नाव, नकाशे, लोकसंख्या, अनुसूचित जातीची, जमातीची लोकसंख्याही दर्शविली जाणार आहे. गट आणि गणरचनेसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती असणार आहेत.
--------------
भौगोलिक सलगतेचा विचार
२०१७ च्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची प्रभाग रचना विचारात घेऊन कार्यवाही केली जाणार आहे. रचना करताना भौगोलिक सलगतेचाही विचार होणार आहे. गट, गणाच्या सीमा, नदी, फ्लायओव्हरचा विचार करून निश्चित केल्या जाणार आहेत. लोकसंख्येच्या अपवादात्मक परिस्थितीत भौगोलिकतेमुळे गट न फोडल्यास लोकसंख्या मर्यादेपेक्षा जास्त असेल, तर कारण द्यावे लागणार आहे.
-------------------
लोकसंख्येची सरासरी काढली जाणार
प्रत्येक गट आणि गणांची रचना करताना जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीची एकूण लोकसंख्या भागिले त्या जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीमध्ये जाणारी एकूण सदस्य संख्या या सूत्रानुसार सरासरी लोकसंख्या निश्चित केली जाणार आहे. गट, गणांची लोकसंख्या, त्या गट, गणांच्या सरासरी लोकसंख्येच्या १० टक्के कमी किंवा १० टक्के जास्त मर्यादेत ठेवता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com