घरांसाठी टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी
घरांसाठी टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २६ : बीएसयूपीमधील १५ टक्के घरे सफाई कर्मचाऱ्यांसाठी देण्याबाबत टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांची कल्याण-डोंबिवली महापालिकेला गुरुवारी (ता. २६) भेट दिली. या वेळी पालिका आयुक्तांनी माहिती दिली तर शेरसिंग डागोर यांनी सफाई कर्मचाऱ्यांशी निगडित पालिकेतील बाबींचा आढावा घेत पालिका अधिकाऱ्यांना त्याविषयी सूचना केल्या.
सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त वंदना गुळवे यांनी वारसा हक्काद्वारे सफाई कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली नियुक्ती, सफाई कर्मचाऱ्यांना लागू केलेली आश्वासित प्रगती योजना, सफाई कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीबाबतची माहिती, श्रमसाफल्य योजना याबाबतची माहिती दिली. तसेच सफाई कर्मचाऱ्यांसाठी वेळोवेळी आरोग्य तपासणी, त्यांच्या क्षमता बांधणीसाठी मार्गदर्शन शिबिरे, तणावमुक्तीसाठी सांस्कृतिक कार्यक्रम, विपश्यना ध्यान साधना शिबिर, योग साधना शिबिर तसेच महिला सफाई कर्मचाऱ्यांसाठी कर्करोग निदान शिबिर असे विविध उपक्रम राबविण्यात येतात, अशीही माहिती दिली. त्याचप्रमाणे सरकारची नमस्ते योजना मलनिस्सारण वाहिन्यांची यांत्रिक पद्धतीने सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी राबविण्यात येते.
महापालिकेने सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कामगार कल्याण अधिकाऱ्याची नियुक्ती केली असून दर महिन्याच्या चौथ्या मंगळवारी या अधिकाऱ्यामार्फत सफाई कर्मचाऱ्यांसाठी वेळ देऊन त्यांच्या अडचणी सोडविल्या जातात, असे गुळवे यांनी सांगितले. पालिकेच्या या उपक्रमाची प्रशंसा करीत तक्रार निवारणासाठी वेळ निश्चित करून द्यावी, अशा सूचना अध्यक्ष डागोर यांनी केल्या. महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात झालेल्या बैठकीस महापालिका आयुक्त अभिनव गोयल, अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त वंदना गुळवे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त प्रसाद बोरकर, सहाय्यक संचालक नगररचना संतोष डोईफोडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपा शुक्ल, महापालिका सचिव किशोर शेळके तसेच इतर अधिकारी, कर्मचारी आणि विविध सफाई कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
विविध धोरणांबाबत समाधान
लाड पागे समितीअंतर्गतची ३० प्रकरणे जलद गतीने निकाली काढावी, तसेच श्रमसाफल्य आवास योजनेसाठी एका नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, सफाई कर्मचाऱ्यांच्या वसाहतीच्या जागेचे सर्वेक्षण करून विविध योजनांच्या माध्यमातून मालकी हक्क देण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांची समिती करून कालबद्ध कार्यवाही करावी, यासाठी कामगार संघटनांचीदेखील मदत घ्यावी, अशा सूचना महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष डागोर यांनी या वेळी दिल्या. महापालिका सफाई कर्मचाऱ्यांसाठी राबवत असलेल्या विविध धोरणांबाबत समाधान व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.