बहुमजली वाहनतळ सहा महिन्यातच बंद

बहुमजली वाहनतळ सहा महिन्यातच बंद

Published on

तुर्भे, ता. २८ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या वतीने बेलापूरमध्ये पाच मजली वाहनतळ उभारण्यात आले आहे. डिसेंबर २०२४ पासून नागरिकांसाठी खुले करण्यात आले होते; मात्र सहा महिन्यांतच ते बंद करण्यात आले आहे. ज्या ठेकेदाराला वाहनतळ चालवण्यासाठी दिले होते त्याच्याकडून महापालिकेने हे आपल्या ताब्यात घेतले आहे. वाहनधारकांच्या अल्प प्रतिसादामुळे वाहनतळ बंद करण्यात आल्याचे समजते.
शहरातील वाहन पार्किंगची समस्या निकाली काढण्यासाठी बेलापूर सेक्टर १५मध्ये महापालिकेच्या वतीने तळमजला अधिक चार मजली वाहनतळ उभारण्यात आले आहे. यासाठी महापालिकेने ३४.६३ कोटी रुपये खर्च केले आहेत. १५ डिसेंबर २०२४ला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या वाहनतळाचे उद्‍घाटन करण्यात आले होते. तेव्हापासून हे वाहनतळ नागरिकांसाठी पे अँड पार्क या धर्तीवर सुरू करण्यात आले होते; मात्र या वाहनतळाला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे समजते.
-------------------
सर्व गाड्या हटवण्याची सूचना
वाहनतळाची क्षमता ४७६ चारचाकी आणि १२१ दुचाकी वाहनांच्या पार्किंगची आहे. बेलापूर विभाग अधिकारी डॉ. अमोल पालवे यांनी या ठेकेदाराला ही पे अँड पार्क सुविधा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. येथे उभ्या असलेल्या सर्व गाड्या हटवण्याची सूचनाही केली आहे. या आशयाची सूचना या वाहनतळाच्या भिंतीवरही लावण्यात आली आहे.
-------------------
ठेका संपल्याचे कारण
वाहनतळाला हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने ते सहा महिन्यांतच बंद करावे लागले असल्याची चर्चा आहे; मात्र ठेकेदाराचा ठेका संपला असल्याने त्याच्याकडून हे वाहनतळ महापालिकेने परत घेतले असल्याची माहिती बेलापूर विभाग कार्यालयातून मिळाली आहे. याबाबत विभाग अधिकारी डॉ. अमोल पालवे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com