स्केटिंग मध्ये तीन सुवर्ण पदकांची कमाई करणारी मुंबईची गोल्डन कन्या

स्केटिंग मध्ये तीन सुवर्ण पदकांची कमाई करणारी मुंबईची गोल्डन कन्या

Published on

स्केटिंगमध्ये तीन सुवर्णपदकांची कमाई
सात वर्षांच्या ज्येष्ठाची ऐतिहासिक कामगिरी
प्रभादेवी, ता. २८ (बातमीदार) : राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर पदकांची कमाई करीत सात वर्षांच्या ज्येष्ठा पवार हिने कोलकाता येथे झालेल्या स्केटिंग स्पर्धेत पुन्हा एकदा तीन सुवर्णपदाकांची कमाई करीत ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
रोलर स्केट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने कोलकाता येथे १९ ते २४ जूनदरम्यान पार पडलेल्या ओपन नॅशनल रोड स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत मुंबईच्या सातवर्षीय ज्येष्ठा पवार हिने तीन सुवर्णपदके जिंकली. रोलर स्केट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या स्पर्धेत मुंबईमधील सुवर्णपदके पटकवणारी ही पहिलीच मुलगी ठरली आहे. याआधीही थायलंड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत ज्येष्ठा हिने तीन सुवर्णपदके जिंकली होती.
लोअर परेल येथे राहणाऱ्या ज्येष्ठाला प्रशिक्षक मेहमूद सिद्धिकी, राज सिंग, अजय शिवलानी यांचे मार्गदर्शन मिळाले.
ज्येष्ठाचे वडील शशांक पवार यांनी सांगितले, ‘ज्येष्ठा स्केटिंगचा तीन तास कसून सराव करीत आहे. स्केटिंगमध्ये महाराष्ट्राचा पहिला छत्रपती पुरस्कार मिळवण्याचे तिचे स्वप्न आहे. भारतासाठी ऑलम्पिक स्पर्धेतदेखील सुवर्णपदक मिळविण्यासाठी तिच्याकडून सराव करून घेण्यात येत आहे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com