विलास देशमुख यांची अध्यक्षपदी निवड
किन्हवली (बातमीदार)ः ठाणे जिल्हा देशमुख मराठा समाज उन्नती मंडळाच्या ठाणे जिल्हाध्यक्षपदी विलास देशमुख यांची हंगामी अध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली. तत्कालीन अध्यक्ष काशिनाथ झुंझारराव यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. संगमेश्वर येथील मराठा समाज मंदिरात संचालक मंडळाची रविवारी (ता. २९) विशेष बैठक घेण्यात आली. या वेळी सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव, ॲड. प्रमोद चौधरी, कार्याध्यक्ष जयवंत सूर्यराव, उपाध्यक्ष रूपचंद झुंजारराव, उल्हासनगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष उज्ज्वल देशमुख, कल्याण डोंबिवली पालिकेचे माजी उपमहापौर शरद गंभीरराव, राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार गट प्रदेश चिटणीस कालिदास देशमुख उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.