रिक्षावाल्यांचे धाबे दणाणाले
रिक्षावाल्यांचे धाबे दणाणाले
नागरिकांच्या जीवाशी खेळ; ४७१ रिक्षांचे परमिट होणार रद्द
ठाणे शहर, ता. ३० (ता. बातमीदार) : वाहतुकीचे नियम मोडून प्रवाशांच्या जीवाशी खेळणारे रिक्षाचालक वाहतूक पोलिसांच्या रडारवर आले आहेत. अवघ्या १२ दिवसांत वाहतूक पोलिसांनी प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या ४७१ रिक्षांवर परमिटचे उल्लंघन केल्याची कारवाई केली आहे. अनेकदा दंड करूनही हे रिक्षाचालक वारंवार कायद्याचा भंग करीत असल्याचे वाहतूक पोलिसांना आढळून आले होते. नाकाबंदीत त्यांचा शोध घेऊन कठोर कारवाई केली आहे. आजवरची अशा प्रकारची ही सर्वात मोठी कारवाई असून, ती पुढेही याच पद्धतीने सुरूच राहणार असल्याने नियम मोडणाऱ्या परमिटधारक रिक्षाचालकांचे धाबे दणाणले आहेत.
ठाणे आयुक्तालयाचे वाहतूक विभाग उप आयुक्त पंकज शिरसाट हे प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई करीत असताना एका रिक्षाचालकाने त्यांच्या अंगावर रिक्षा घालण्याचा प्रयत्न केला होता. त्यामध्ये शिरसाट जखमी झाले होते. या घटनेची ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी गांभीर्याने दखल घेत प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या रिक्षाचालकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार वाहतूक पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला असून, वारंवार वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या तब्बल ४७१ रिक्षांचा अवघ्या १२ दिवसांत शोध घेऊन यांच्यावर मोटार वाहन कायदा कलम ६६ (१) आर /डब्ल्यू सेक्शन १९२ (अ) अन्वये परमिटचे उल्लंघन केल्याच्या कारवाया केल्या आहेत.
-------------------------------
परमिट रद्द करण्यावर निर्णय
वाहतूक विभागाकडून अशा करावाया करून या रिक्षांचे परमिट रद्द करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ), ठाणे यांच्याकडे या रिक्षांची यादी पाठवली आहे. वाहतूक विभागाने केलेल्या कारवायांवर नियमानुसार चौकशी करून या रिक्षांचे परमिट रद्द करण्यावर निर्णय घेतला जाणार आहे.
-----------------------------
रिक्षांवर झालेली दंडात्मक कारवाई
१ जानेवारी ते २३ जून २०२५ या सहा महिन्यांच्या कालावधीत ठाणे आयुक्तालयातील १,१०,४७३ वेळा कायदा मोडणाऱ्या रिक्षाचालकांना तब्ब्ल ३३ कोटी १५ लाख २२ हजार रुपयांचा ऑनलाइन दंड पाठवण्यात आला आहे.
ऑनलाइन केलेल्या कारवाया
* फ्रंट सीट - ६५,७७६, ऑनलाइन दंड - ८,६०,६८,००० रुपये
* चुकीच्या ठिकाणी रिक्षा उभी करणे - १२,७५३, ऑनलाइन दंड - १,५८,७६,५००
* अडथळा होईन अशा ठिकाणी रिक्षा उभी करून जाणे - १०,३६९, ऑनलाइन दंड - १,११,२६,५००
* पांढरा गणवेश नसणे - ७,७५१, दंड - ८५,०८,०००
* जास्त प्रवासी बसवणे - ७,०३७, दंड - १,४०,४३,०००
* सिग्नल पोलिसांचे मन्युअल सिग्नल उल्लंघन करणे - २,०३९, दंड - १६,७९,५००
* इतर (भाडे नाकारणे, विमा नसणे, दारू पिऊन गाडी चालवणे इत्यादी.) - ४,७४८, दंड - ६८,५१,०५०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.