जागतिक स्पर्धेमध्ये शुभांगी घुले यांना कांस्यपदक
पनवेल, ता. ३० (बातमीदार) : पनवेल महापालिकेच्या अग्निशमन दलातील महिला कर्मचारी शुभांगी संतोष घुले यांना अमेरिका येथील अल्बामा येथे नुकत्याच पार झालेल्या २१व्या जागतिक पोलिस व अग्निशमन स्पर्धेमध्ये कांस्यपदक मिळाले आहे.
अमेरिकेतील अल्बामा येथे २१वी जागतिक पोलिस व अग्निशमन स्पर्धा ‘अल्टिमेट फायर फायटिंग चॅलेंज’ आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत पनवेल महापालिकेच्या अग्निशमन दलातील कर्मचारी शुभांगी घुले यांनी सहभाग घेतला होता. त्यांनी स्पर्धेत कांस्यपदक मिळवून भारताचे नाव उज्ज्वल केले आहे. अल्बामा येथे झालेल्या स्पर्धेत जगातील अग्निशमन आणि पोलिस दलांचे उत्कृष्ट संघ सहभागी झाले होते. ही स्पर्धा अग्निशमन, पोलिस दल आणि बचावकार्यातील व्यावसायिक कौशल्यांची चाचणी घेणारी होती. यात जगभरातून ५० देश सहभागी झाले होते. शुभांगी यांनी इतर देशांच्या स्पर्धकांशी सामना करीत या कठीण आणि तडफदार स्पर्धेत आपला जलद आणि उत्कृष्ट कामगिरीचा दाखला देत कांस्यपदक प्राप्त केले. या यशाबद्दल आयुक्त मंगेश चितळे, अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे यांच्यासह महापालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी शुभांगी घुले यांचे अभिनंदन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.