उंबरपाडा येथे कृषीदिवस साजरा

उंबरपाडा येथे कृषीदिवस साजरा

Published on

मुरबाड (वार्ताहर)ः कृषी महाविद्यालय सरळगाव कृषी दिनाचे निमित्त साधत विविध कार्यक्रम करण्यात आले. यावेळी शाळेचा परिपाठ, राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत म्हणून गावकऱ्यांच्या उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधताना शेतीचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. कृषी महाविद्यालय सरळगाव चतुर्थ वर्षातील कृषी योद्धा गटाच्या विद्यार्थ्यांनी जि.प.शाळा उंबरपाडा येथे शेतकरी ज्येष्ठ नागरिकांना शेती विषयक माहिती दिली. यावेळी उंबरपाडा ग्रामस्थ शेतकरी, शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते. यानिमित्ताने गावात कृषी दिंडी काढून शेती आणि पर्यावरणाचा समतोल राखावा, याकरिता जनजागृती करण्यात आली. यावेळी दिंडीतून जनजागृती तसेच शेतकऱ्यांना योग्य माहिती मिळत असल्याने विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांचे आभार व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com