थोडक्‍यात बातम्या रायगड

थोडक्‍यात बातम्या रायगड

Published on

पंकज तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप
माणगाव (बातमीदार) ः सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे पंकज तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त आज मंगळवारी (१ जुलै) रायगड जिल्हा परिषद शाळामधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. स्वराज्य संघटनेचे संस्थापक, अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त माणगाव तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद कळमजे, चेरवली, कोशिंबळे, साले, शाळांना तसेच बामणोली येथील हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साहित्य तसेच खाऊ वाटप करण्यात आले. त्या वेळी पंकज तांबे व त्यांचे सहकारी मित्रमंडळ, मुख्याध्यापक सुदर्शन वाघोरकर, शिक्षिका सीमा भांड, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुधीर वाढवळ, चेरवली शाळेचे शिक्षक मगर, साले ग्रामस्थ सुभाष भोनकर, आनंद भोनकर, बामणोली हायस्कूलचे मुख्याध्यापक जगदाळे तसेच शिक्षक वृंद या वेळी उपस्थित होता.
.................
माणगावात घरफोडी करून लाखोंची चोरी
माणगाव (बातमीदार) ः माणगाव तालुक्यातील कशेणे येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून रोख रकमेसहित दागिन्यांची चोरी केली. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कशेणे येथे दोन अज्ञात इसमांनी फिर्यादी रवींद्र सायगावकर (रा. कशेणे) यांच्या राहत्या घराच्या मागील दरवाजामधून प्रवेश केला. या वेळी त्‍यांच्या बेडरूममधील लोखंडी कपाटाचा दरवाजा उघडून रोख रक्‍कम सहा हजार रुपये व सोन्याचे दागिने, असा एकूण दीड लाख रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. या घटनेचे माणगाव पोलिस ठाणे येथे नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलिस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक जाधव करीत आहेत.
.....................
डाॅक्टर्स डेनिमित्त रुग्णांना खाऊवाटप
अलिबाग (वार्ताहर) : डॉक्टर्स डेचे औचित्य साधून अलिबाग-मुरूड मेडिकल असोसिएशनतर्फे मंगळवारी मेडिकल कॉलेज हॉस्पिटल येथे रुग्णांना खाऊ वाटप करण्यात आले. या वेळी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक अधिष्ठाता डॉ. राजकुमार पाटील, डॉ. धनाजी बागल यांनी प्रमुख उपस्थिती नोंदविली. या कार्यक्रमाची संकल्पना डॉ. गणेश गवळी यांची असून, यासाठी मार्गदर्शन डॉ. आशीष भगत यांनी केले होते. कार्यक्रमात अध्यक्ष डॉ. वैभव भगत, डॉ. आनंद नाईक, डॉ. किरण जैन, डॉ. मनीष म्हात्रे, डॉ. विजय घरत, डॉ. स्वप्ना शिंदे, डॉ. आर. जे. जैन उपस्थित होते. जवळपास ५० रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला.
............
लायन्स क्लब खोपोलीच्या अध्यक्षपदी अविनाश राऊत
खोपोली (बातमीदार) : खोपोली लायन्स क्लब अध्यक्षपदी अविनाश राऊत यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांचा पदग्रहण सोहळा नुकताच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या व लायन्स सदस्यांच्या उपस्थितीत पार पडला. या वेळी नूतन अध्यक्ष अविनाश राऊत आणि अन्य पदाधिकाऱ्यांना कर्तव्य आणि जबाबदारीची शपथ देऊन पदभार सोपविण्यात आला. यापूर्वी मागील वर्षभरात लायन्स क्लबकडून पूर्णत्वास गेलेल्या प्रकल्पांचा आढावा माजी अध्यक्ष दीपेंद्रसिंह भदोरिया यांनी मांडला. सचिव पदावर निजामुद्दीन जळगांवकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नूतन अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्यावर लायन्स अविनाश राऊत यांनी येणाऱ्या वर्षातील प्रमुख उपक्रमांची माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com