मोहने-अंबिवली रस्ता खड्डेमय
मोहने-अंबिवली रस्ता खड्डेमय
कल्याण, ता. १ (वार्ताहर) : महापालिकेच्या ग्रामीण अ प्रभाग क्षेत्रातील मोहने ते आंबिवली स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर खड्डे पडल्याने अक्षरश: चाळण झाली आहे. रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
मोहने आंबिवली स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर, उंबर्णी, बल्याणी, टिटवाळाकडे येणाऱ्या जाणऱ्या वाहनांची वर्दळीसह आंबिवली स्थानक पश्चिम ते मोहने पूर्व परिसरात ये-जा करणाऱ्यांमुळे रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते, तर रेल्वेने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांनासह, विद्यार्थी, रेल्वेप्रवासी यांचीदेखील वर्दळ असते. त्यामुळे मुख्य रस्त्यावर पडलेले खड्डे अपघाताला आमंत्रण देत असल्याचे चित्र आहे. अपघातामुळे संभाव्य जीवितहानी झाल्यास याला जबाबदार कोण, असा सवाल यानिमित्ताने केला जात आहे.
प्रशासकीय राजवटीत या रस्त्याकडे दुर्लक्ष होत आहे. रस्त्यावरून पावसाच्या पाण्याचा निचारा होत नसल्याने या रस्त्यातच तळे साचत आहे. पाण्याचा मार्ग मोकळा होण्यासाठी रेल्वे प्रशासन, विकसक, महापालिकेच्या समन्वयातून प्रश्न मार्गी लावला पाहिजे, अशी मागणी होत आहे. दरम्यान, याबाबत अ प्रभागाचे उपअभियंता हरूण इनामदार यांना मोहने-आंबिवली रस्त्यातील खड्ड्यांसंर्दभात विचारले असता त्यांनी म्हटले की, खड्डे भरण्याचे काम उल्हास नदी पूल परिसरात सुरू आहे. या रस्त्यावरील खड्डेदेखील तातडीने भरण्यात येणार असल्याचे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.