क्षयग्रस्त रुग्णांना आहाराचे वाटप
भिवंडी (वार्ताहर)ः ग्रामीण भागात सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विषयक सेवाकार्य करणाऱ्या इंडियन वूमन अँड चिल्ड्रन फाउंडेशनतर्फे दहा क्षयरोग रुग्णांना वर्षभर सकस आहार विनामूल्य दिला जाणार आहे. याच अनुषंगाने भिवंडी पालिकेच्या भाग्यनगर कामतघर येथील नागरी आरोग्य केंद्रातील क्षयग्रस्त रुग्णांना तांदूळ, गहू, डाळ, शेंगदाणे, खाद्यतेल, खजूर, चणे, गूळ अशा प्रकारचे सकस आहाराचे किटचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला क्षयरोग निर्मूलन विभाग प्रमुख डॉ. बुशरा सय्यद शेख, जायंट्स ग्रुपचे विनय सर, गगन जैन उपस्थित होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अंकुश बचूटे, डी. एस, गायकवाड, अमोल भोईर, सूरज खरे, भीम शक्तीचे आईश मोहम्मद, अण्णा हजारे भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे पदाधिकारी विष्णू करंडे, विठोबा सोनवणे, कामगार संघटनेचे श्रीपत तांबे, इंदीसे गटाचे युवक अध्यक्ष कल्पेश घाडगे उपस्थित होते. यावेळी देशातून २०२५ पर्यंत क्षयरोगाच्या निर्मूलन मोहीमेत सहभागी होण्याचा निर्णय संस्थेने घेतला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर जाधव यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.