सारसोळे येथील शाळेला मिळाले शिक्षक

सारसोळे येथील शाळेला मिळाले शिक्षक

Published on

नेरूळ, ता. २ (बातमीदार) : सारसोळे येथील सीबीएसई शाळेत शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थी व पालकांनी आंदोलन केले होते. त्यानंतर जागे झालेल्या प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपात सात शिक्षकांची नियुक्ती केली आहे. महापालिकेच्या सारसोळे सीबीएसईच्या शाळेत नर्सरी ते तिसरीपर्यंतचे सहा वर्ग सुरू असून, फक्त एकच शिक्षक कार्यरत होते. यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी माजी नगरसेवक सूरज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयुक्तांच्या दालनाबाहेर शाळा भरवली होती. या आंदोलनाची दखल घेऊन शिक्षण विभागाच्या उपायुक्त संघरत्ना खिल्लारे यांनी तात्पुरत्या स्वरूपात सात शिक्षक नियुक्त करण्याचा निर्णय घेऊन ३० जूनला सायंकाळी तसे आदेश काढले. या शिक्षकांना तत्काळ शाळेत हजर राहण्याच्या सूचना केल्या आहेत. यामुळे तात्पुरत्या स्वरूपात शिक्षकांचा प्रश्न सुटणार आहे. त्यानंतर कायमस्वरूपी शिक्षकांची नियुक्तीची निविदा प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com