सीवूड्समधील पाळणाघर लवकरच सुरू होणार
नेरूळ, ता. २ (बातमीदार) : सीवूड्स सेक्टर-४८ मधील नवी मुंबई महापालिकेच्या उदासीनतेमुळे २०२१ पासून बंद असलेले पाळणाघर आता पुन्हा सुरू होणार आहे. माजी नगरसेवक विशाल डोळस यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे उपस्थित केलेल्या प्रश्नावर मनमंत्र्यांनी नवी मुंबई मनपा प्रशासनाला सीवूड्स येथील पाळणाघर तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.
वाशी येथील जनता दरबारात माजी नगरसेवक विशाल डोळस यांनी मंत्री गणेश नाईक यांना निवेदन दिले. या निवेदनात महापालिका प्रशासनावर आरोप करताना डोळस यांनी सांगितले की, पाळणाघराची इमारत पालिकेने लाखो रुपये खर्च करून बांधली असून, समाज विकास विभागाच्या निष्क्रयतेमुळे ती सध्या धूळखात आहे. तसेच एसओपी (स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) नसतानाही महापालिका प्रशासन आणि समाज कल्याण विभागाने नागरिकांची दिशाभूल करत पाळणाघर चालवण्यासाठी आयडीएस विभागाला ही इमारत केवळ १२,००० मासिक भाड्याने देण्याचा प्रस्ताव तयार केला होता, परंतु या विभागाच्या प्रमुखांनी स्पष्ट केले आहे की, एसओपी नसल्यामुळे या ठिकाणी केवळ अंगणवाडी चालवली जाईल. त्यावर विशाल डोळस यांनी प्रशासन नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रयत्न करत आहे. यावर डोळस यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना मंत्री गणेश नाईक यांनी समाज विकास विभागाचे अधिकारी किसनराव पालांडे आणि अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांना पाळणाघर तातडीने सुरू करण्याची निर्देश देत यापुढे कोणत्याही प्रकारची टाळाटाळ खपवून घेतली जाणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे हे पाळणाघर लवकरच सुरू होणार असल्याचे मानले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.