२ लाखांच्या गांजासह एकाला अटक
दोन लाखांच्या गांजासह एकाला अटक
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २ : भिवंडी कशेळीकडून बाळकुमकडे जाणाऱ्या रस्त्यावरील दत्त मंदिराजवळ ठाणे शहर पोलिसांनी अटक केली. सुमंता तरेणी साहू (वय ४०, रा. ओरिसा) या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली असून, १० किलो १२० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या गांजाची किंमत दोन लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कापूरबावडी पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार राजीव जाधव हे सोमवार (ता. ३०) ते मंगळवारी (ता. १) रात्रीच्या वेळेस पेट्रोलिंग करत असताना दत्त मंदिराजवळ एक व्यक्ती संशयास्पदरित्या दिसून आला. त्याच्याकडील असलेल्या सामानाबाबत विचारणा केल्यास त्याने उडवाउडवीची उत्तरे देत तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. याचदरम्यान त्याला पकडून त्याची अंगझडती आणि सामानाची तपासणी केली असता गांजा मिळून आला असून, तो जप्त केला आहे.
या कारवाईत त्याच्याकडून गांजा, मोबाईल, रोख रक्कम असा दोन लाख ११ हजार २२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी कापूरबावडी पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायदा अन्वये दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलिस करत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.