वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कोलशेतचा ना फेरिवाला क्षेत्र

वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कोलशेतचा ना फेरिवाला क्षेत्र

Published on

कोलशेतमध्ये ‘ना-फेरीवाला क्षेत्र’
फेरीवाल्यांमुळे वाहतुकीस अडथळा; ठाणे पालिकेचा निर्णय
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २ : पालिका क्षेत्रातील कोलशेत भागात काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांनी बस्तान मांडले आहे. त्यामुळे या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी असते. तसेच खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी गॅस आणि स्टोव्हचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे स्फोट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यासंदर्भात वायुसेनेच्या अधिकाऱ्यांनी पालिका प्रशासनाकडे तक्रार केली. यानंतर प्रशासनाने कोलशेत रस्त्यावरील डीमार्टपासून ते कोलशेत गाव आणि लोढा अमारा वाय जंक्शनपासून वायुसेनेच्या स्थानकापर्यंतच्या अकबर कॅम्प परिसरातील रस्त्याच्या दोन्ही बाजू ना-फेरीवाला क्षेत्र करण्याचा निर्णय घेतला आहे.
ठाण्यातील पालिका क्षेत्रातील घोडबंदर भागात मोठ्या प्रमाणात नागरीकरण होत आहे. तसेच घोडबंदरला जाण्यासाठी अंतर्गत रस्ते, पर्यायी रस्त्यांची बांधणीदेखील करण्यात आली आहे. अनेकदा घोडबंदरच्या मुख्य मार्गावर वाहतूक कोंडी झाल्यानंतर अनेक जण पर्यायी मार्ग म्हणून कोलशेत मार्गाचा वापर करतात. गेल्या काही वर्षांपासून या मार्गावर फेरीवाल्यांचे अतिक्रमण वाढत आहे. या रस्त्यावरील डीमार्टपासून ते कोलशेत गाव आणि लोढा अमारा वाय जंक्शनपासून वायुसेनेच्या स्थानकापर्यंतच्या अकबर कॅम्प परिसरातील रस्त्याच्या दोन्ही बाजूस फेरीवाले ठाण मांडून बसत आहेत.

सुरक्षिततेचा प्रश्न
अकबर कॅम्प रोडला लागूनच भारतीय वायुसेनेचे स्थानक आहे. त्यामुळे हा परिसर अतिसंवेदनशील म्हणून ओळखला जातो. या क्षेत्रात पानटपऱ्या आणि खाद्यपदार्थ विक्रीच्या गाड्यांमध्ये मोठी वाढ होत असल्यामुळे सुरक्षिततेचा आणि वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत आहे. यासंदर्भात वायुसेनेच्या अधिकाऱ्यांनी तक्रार केल्यानंतर खडबडून जाग आलेल्या ठाणे महापालिकेने आता कोलशेत रस्त्यावरील डीमार्टपासून ते कोलशेत गाव आणि लोढा अमारा वाय जंक्शनपासून वायुसेनेच्या स्थानकापर्यंतच्या अकबर कॅम्प परिसरातील रस्त्याच्या दोन्ही बाजू ना-फेरीवाला क्षेत्र करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीच्या प्रस्तावास प्रशासकीय सभेने मान्यता दिल्याने हा परिसर फेरीवालामुक्त होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com