तहसीलदार कार्यालय होणार पार्किंग प्लाझात स्थलांतरीत

तहसीलदार कार्यालय होणार पार्किंग प्लाझात स्थलांतरीत

Published on

तहसीलदार कार्यालय होणार पार्किंग प्लाझात स्थलांतरीत
दाखले, विविध योजनांच्या लाभार्थ्यांची होणार पायपीट
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २ : मुख्य बाजारपेठेत असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागासह तहसीलदार कार्यालय यांचा एकत्रित पुनर्विकास करण्यात येत आहे. त्यामुळे हे दोन्ही कार्यालयांचे स्थलांतर ज्युपिटर हॉस्पिटलशेजारी असलेल्या पार्किंग प्लाझा येथे करणार आहे. त्यानुसार तहसीलदार कार्यालयही स्थलांतरणाच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. मात्र, तहसील कार्यालयामार्फत नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात येतो. यामध्ये विद्यार्थ्यांसह वयोवृद्ध व अपंगाचा समावेश आहे. त्यामुळे आता या योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागणार आहे.
ठाणे रेल्वे स्थानकापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर तहसीलदार कार्यालय व सार्वजनिक बांधकाम विभाग आहे. या दोन्ही कार्यालयांच्या इमारती या जुन्या व जीर्ण झाल्या असल्यामुळे त्यांचा एकत्रित पुनर्विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम व तहसील कार्यालयाचे स्थलांतर करणे गरजेचे आहे. त्यानुसार ठाणे पालिकेने या कार्यालयाच्या तात्पुरत्या स्थलांतरणासाठी ज्युपिटर रुग्णालयाशेजारील पार्किंग प्लाझा येथे जागा दिली आहे. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाचे स्थलांतरण झाले असून आता तहसील कार्यालयही करणार आहे.
या कार्यालयामार्फत विधवा महिलांसाठीची योजना, श्रावणबाळ योजना, सेतू मार्फत अधिवास दाखला, उत्पन्नाचा दाखला यांसह शासनाच्या विविध योजनांच्या लाभ व दाखले देण्यात येत असतात. यासाठी आता त्यांना थेट माजिवडा पार्किंग प्लाझा गाठावे लागणार आहे. त्यामुळे वृद्धांसह विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com